वर्ल्ड कप टीम – पाकिस्तान


१९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषकातील आठ संघापैकी एक संघ असलेल्या पाकिस्तानने १९७९ ते १९८७ दरम्यान झालेल्या तिन्ही विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती पण त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियात १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषकात इम्रान खानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. १९९९ च्या विश्वचषकात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडुन अंतिम सामन्यांत पराभव स्विकारावा लागला. त्यानंतरच्या २००३ व २००७ मध्ये पाकिस्तानला सरस कामगिरी करत आली नाही पण २०११ च्या विश्वचषकात पुन्हा एकदा पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली पण त्यांना भारताविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. मागील काही वर्षांतील पाकिस्तानची कामगिरी तितकीशी सरस राहिली नाही. पण २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत अंतिम सामन्यांत भारतीय संघाचा पराभव करत सरफराज अहमदच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले. चॅम्पियन ट्रॉफीच्या विजेतेपदानंतर पाकिस्तानला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. १९९२ च्या विश्वचषकाप्रमाणे या विश्वचषकातही प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार आहेत त्यामुळे संघाला विश्वचषकात प्रत्येक संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागेल हे मात्र नक्की म्हणुन ते चॅम्पियन ट्रॉफीची पुनरावृत्ती करु शकेल का हे पाहावे लागेल.
महत्त्वाचे खेळाडु:- बाबर आझम, हसन अली, फखर झमान, इमाम उल हक, शोएब मलिक
आयसीसी क्रमवारीतील स्थान:- ६
विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९९२ मध्ये विजेतेपद
यशस्वी कर्णधार इम्रान खान (१९९२)
संघाच्या सर्वाधिक धावा ३४९/१० वि. झिम्बाब्वे (२००७)
निच्चांकी धावसंख्या ७४ वि. इंग्लंड (१९९२)
सर्वाधिक धावा जावेद मियॉंदाद – १०८३ (१९७५ – १९९६)
सर्वोच्च धावा इम्रान नझीर – १६० वि. झिम्बाब्वे (२००७)
सर्वाधिक शतक रमीझ राजा – ३
सर्वाधिक सरासरी रमीझ राजा – ५३.८४
सर्वाधिक मोठी भागिदारी सईद अन्वर व वजपर्रहल्लाह वस्ती – १९४ वि. न्युझिलंड (१९९९)
सर्वाधिक बळी वसीम अक्रम – ५५ बळी
सर्वाधिक झेल इंझमाम उल हक – १६ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत मोईन खान – ३० बळी (झेल २३ यष्टिचीत ७)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण शाहिद आफ्रीदी – ५/१६ वि. केनिया (२०११)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा जावेद मियॉंदाद (१९९२) – ४३७ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी शाहिद आफ्रीदी (२०११) – २२ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल इंझमाम उल हक (१९९९) – ६ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत मोईन खान (१९९९) – १६ बळी (झेल १२ यष्टिचीत ४)

संघ:- सरफराज अहमद (कर्णधार), बाबर आझम, हसन अली, फखर झमान, इमाम उल हक, शोएब मलिक, हॅरीस सोहेल, इमाद वासिम, असिफ अली, मोहम्मद हफिज, शादाब खान, मोहम्मद हसनैन, शहीन आफ्रीदी, मोहम्मद अमीर, वाहब रियाज
३१ मे २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००
३ जुन २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
७ जुन २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
१२ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया दु. ३.००
१६ जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
२३ जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००
२६ जुन २०१९ वि. न्युझिलंड दु. ३.००
२९ जुन २०१९ वि. अफगानिस्तान दु. ३.००
५ जुलै २०१९ वि. बांग्लादेश सं. ६.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment