वर्ल्ड कप टीम – न्युझिलंड


प्रत्येक आयसीसी स्पर्धेत “डार्क हॉर्स” ने ओळखल्या जात असलेल्या न्युझिलंडच्या संघाने ६ वेळेस उपांत्य फेरीत धडक मारली तर २०१५ मध्ये मायदेशात झालेल्या विश्वचषकात न्युझिलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयसीसी स्पर्धांचा विचार करता २००० ची आयसीसी नॉकआउट स्पर्धा सोडल्यास न्युझिलंडला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. स्टिफन फ्लेमिंग, नॅथन अॅस्टल, रिचर्ड हॅडली, ख्रिस क्रेन्स, मार्टिन क्रो, ख्रिस हॅरिस, जॉन राईट, जेफ क्रो, डॅनियल व्हिटोरी आण ब्रेंडन मॅकलम यांसारख्या तगड्या खेळाडुंनी न्युझिलंड संघाचे नेतृत्व केले आहे पण १९७५ ते २०१५ दरम्यान ११ विश्वचषक स्पर्धांपैकी एकाही विश्वचषकावर त्यांना कब्जा करता आलेला नाही.

महत्त्वाचे खेळाडु:- केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मार्टिन गुप्टील, टॉम लेथम, रॉस टेलर, टिम साउदी

आयसीसी क्रमवारीतील स्थान:- ४

विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- २०१५ मध्ये उपविजेतेपद
यशस्वी कर्णधार ब्रेडन मॅकलम (२०१५) – उपविजेतेपद
संघाच्या सर्वाधिक धावा ३९३/६ वि. वेस्ट इंडिज (२०१५)
निच्चांकी धावसंख्या ११२ वि. ऑस्ट्रेलिया (२००३)
सर्वाधिक धावा स्टिफन फ्लेमिंग – १०७५ (१९९६ – २००७)
सर्वोच्च धावा मार्टिन गुप्टील – नाबाद २३७ वि. वेस्ट इंडिज (२०१५)
सर्वाधिक शतक ग्लेन टर्नर, मार्टिन गुप्टील, नॅथन अॅस्टल, स्कॉट स्टायरिस व स्टिफन फ्लेमिंग – २
सर्वाधिक सरासरी ग्लेन टर्नर – ६१.२०
सर्वाधिक मोठी भागिदारी मार्टिन गुप्टील व ब्रेडन मॅकलम – १६६ वि. झिंबाब्वे (२०११)
सर्वाधिक बळी जेकब ओरम – ३६ बळी
सर्वाधिक झेल ख्रिस केर्न्स – १६ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत ब्रेडन मॅकलम – ३२ बळी (झेल ३० यष्टिचीत २)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण टिम साउदी – ७/३३ वि. इंग्लंड (२०१५)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा मार्टिन गुप्टील (२०१५) – ५४७ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी ट्रेंट बोल्ट (२०१५) – २२ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल नॅथन अॅस्टल (१९९९) – ६ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत ब्रेडन मॅकलम (२००७) – १४ बळी (झेल १३ यष्टिचीत १)

संघ:- केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्टिन गुप्टील, टॉम लेथम, रॉस टेलर, टिम साउदी, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रॅंडहोम, इश सोढी, मिशेल सॅंटनर, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, कॉलिन मुनरो, जेम्स निशम, हेनरी निकोल्स
१ जुन २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
५ जुन २०१९ वि. बांग्लादेश सं. ६.००
८ जुन २०१९ वि. अफगानिस्तान सं. ६.००
१३ जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
१९ जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००
२२ जुन २०१९ वि. वेस्ट इंडिज सं. ६.००
२६ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
२९ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया सं. ६.००
३ जुलै २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment