वर्ल्ड कप टीम – अफगाणिस्तान


२००९ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानचा संघ २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत अपयशी ठरला पण त्यानंतर ४ वर्षांनंतर अफगाणिस्तानचा संघ २०१५ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला. त्या स्पर्धेत अफगाणिस्तानने स्कॉटलंडविरुद्ध एकमेव विजय मिळवला पण त्यानंतर संघाने जबरदस्ती कामगिरी केली आहे. आयसीसीने २०१९ ची विश्वचषक स्पर्धा फक्त १० संघाची खेळविण्यात येणार अशी घोषणा केली त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ पात्र होईल की नाही असे दिसत होते पण विश्वचषक क्वालिफायरच्या अंतिम सामन्यांत अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्वचषक क्वालिफायरवर आपले नाव तर कोरलेच त्यासोबतच अफगाणिस्तानचा संघ २०१९ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला. अफगाणिस्तानची मागील काही वर्षांतील कामगिरी पाहता त्यांना कोणताही संघ कमी लेखण्याची चूक करणार नाही हे मात्र नक्की. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यास अफगाणिस्तानचे खेळाडु उत्साही असतील यात काही शंकाच नाही.
महत्त्वाचे खेळाडु:- रशिद खान, मोहम्मद नबी, मोहम्मद शेहझाद, हझरतुल्लाह झझाई, मुजीब उर रहमान
आयसीसी क्रमवारीतील स्थान:- १०
विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- २०१५ मध्ये गटात बाद
यशस्वी कर्णधार मोहम्मद नबी (२०१५) – साखळी फेरी
संघाच्या सर्वाधिक धावा २३२ वि. श्रीलंका (२०१५)
निच्चांकी धावसंख्या १४२ वि. ऑस्ट्रेलिया (२०१५)
सर्वाधिक धावा शमिउल्लाह शिनवारी – २५४ (२०१५)
सर्वोच्च धावा शमिउल्लाह शिनवारी – ९६ वि. स्कॉटलंड (२०१५)
सर्वाधिक शतक ०
सर्वाधिक सरासरी शमिउल्लाह शिनवारी – ४४.३३
सर्वाधिक मोठी भागिदारी असगर अफगाण व शमिउल्लाह शिनवारी – ८८ वि. श्रीलंका (२०१५)
सर्वाधिक बळी शापुर झदरान – १० बळी
सर्वाधिक झेल मोहम्मद नबी – ३ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत अफसर झझाई – ७ बळी (झेल ७ यष्टिचीत ०)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण शापुर झदरान – ४/३८ वि. स्कॉटलंड (२०१५)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा शमिउल्लाह शिनवारी (२०१५) – २५४ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी शापुर झदरान (२०१५) – – १० बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल मोहम्मद नबी (२०१५) – ३ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत ब्रेडन मॅकलम (२००७) – १४ बळी (झेल १३ यष्टिचीत १)

संघ:- गुलबदिन नैब (कर्णधार), रशिद खान, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद, हझरतुल्लाह झझाई, मुजीब उर रहमान, अफ्ताब आलम, असगर अफगाण, दौलत झदरान, हमीद हसन, हसमतुल्लाह शाहिदी, नजिबुल्लाह झदरान, नुर अली झदरान, रहमत शाह, शमीउल्लाह शिनवारी
१ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया सं. ६.००
४ जुन २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
८ जुन २०१९ वि. न्युझिलंड सं. ६.००
१५ जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका सं. ६.००
१८ जुन २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
२२ जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
२४ जुन २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
२९ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
४ जुलै २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment