वर्ल्ड कप टीम –भारत


१९७५ व १९७९ अशा सलग दोन विश्वचषकात विजेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिजला १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने पराभवाचा धक्का देत विजेतेपदावर कब्जा केला आणि विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ ठरला. २००३ च्या विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. २००७ च्या स्पर्धेत साखळीत बाद झाल्यानंतर मायदेशात झालेल्या स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनंतर विजेतेपदाला गवसणी घातली. २०१५ च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. पण २०१५ च्या विश्वचषकानंतरची भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल यात शंका नाही. मागील काही वर्षांतील भारतीय संघाची इंग्लंडमधील पाहता भारतीय संघ विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करेल यात शंका. भारतीय संघ चांगल्या लयीत दिसत आहे पण तब्बल चार वर्षांनंतरही चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न भारतीय कर्णधार विराट कोहलीला सतावत आहे. कारण मागील चार वर्षांत तब्बल १२ खेळाडु चौथ्या क्रमांकावर खेळले पण कोणत्याही खेळाडुला आपले स्थान पक्के करता आले नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे.

महत्त्वाचे खेळाडु:- विराट कोहली, महेंदसिंग धोनी, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, शिखर धवन, मोहम्मद शमी, कुलदिप यादव, हार्दिक पंड्या

आयसीसी क्रमवारीतील स्थान:- २

विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९८३ व २०११ मध्ये विजेतेपद
यशस्वी कर्णधार कपिल देव (१९८३) आणि महेंद्रसिंग धोनी (२०११)
संघाच्या सर्वाधिक धावा ४१३/५ वि. बर्मुडा (२००७)
निच्चांकी धावसंख्या १२५ वि. ऑस्ट्रेलिया (२००३)
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर – २२७८ (१९९२ -२०११)
सर्वोच्च धावा सोरभ गांगुली – १८३ वि. श्रीलंका (१९९९)
सर्वाधिक शतक सचिन तेंडुलकर – ६
सर्वाधिक सरासरी राहुल द्रविड – ६१.४२
सर्वाधिक मोठी भागिदारी सोरभ गांगुली व राहुल द्रविड – ३१८ वि. श्रीलंका (१९९९)
सर्वाधिक बळी जहीर खान आणि जवागल श्रीनाथ – ४४
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण आशिष नेहरा – ६/२३ वि. इंग्लंड (२००३)
सर्वाधिक झेल अनिल कुंबळे – १४ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत महेंद्रसिंग धोनी – ३२ बळी (झेल २७ यष्टिचीत ५)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (२००३) – ६७३ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी जहीर खान (२०११) – २१ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल अनिल कुंबळे (१९९६) – ८ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत राहुल द्रविड (२००३) – १६ बळी (झेल १५ यष्टिचीत १)

संघ:- विराट कोहली (कर्णधार), महेंदसिंग धोनी, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, शिखर धवन, मोहम्मद शमी, कुलदिप यादव, हार्दिक पंड्या, के एल राहुल, भुवनेश्वर कुमार, केदार जाधव, विजय शंकर, यजुवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा
५ जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००
९ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया दु. ३.००
१३ जुन २०१९ वि. न्युझिलंड दु. ३.००
१६ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
२२ जुन २०१९ वि. अफगाणिस्तान दु. ३.००
२७ जुन २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००
३० जुन २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
२ जुलै २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
६ जुलै २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment