वर्ल्ड कप टीम –दक्षिण आफ्रिका


१९७५ च्या विश्वचषकानंतर आफ्रिकेच्या संघावर बंदी घालण्यात आली होती आणि तब्बल १८ वर्षांच्या कालावधीनंतर आफ्रिकेनी १९९२ च्या विश्वचषकात पुनरागमन केले. १९९२ च्या विश्वचषकात त्यांना डर्कवर्थ लुईस चा फटका बसला. १९९२, १९९९, २००७ व २०१५ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनी उपांत्य फेरीत धडक मारली होती पण ते अंतिम फेरीत धडक मारण्यात अपयशी ठरले. २००३ साली पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत भरविण्यात आली होती पण त्यांच्यावर गटातच बाद होण्याची नामुष्की ओढवली होती. २०१५ च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यांत न्युझिलंडकडुन झालेल्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकाबाहेर पडला होता. मागील वर्षी संघाचा प्रमुख फलंदाज ए बी डीव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्याने दक्षिण आफ्रिकेची मधली फळी काहीशी कमजोर झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीची जिम्मेदारी असेल ती कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस, डेविड मिलर आणि जे पी ड्युमिनी.

महत्त्वाचे खेळाडु:- फाफ ड्यु प्लेसिस, कागिसो रबाडा, डेल स्टेन, क्विंटन डी कॉक, हाशिम अमला, इम्रान ताहिर

आयसीसी क्रमवारीतील स्थान:- ६
विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९९२, १९९९, २००७ आणि २०१५ मध्ये उपांत्य फेरी
यशस्वी कर्णधार केपलर वेसल्स (१९९२), हॅन्सी क्रोनिए (१९९९), ग्रॅम स्मिथ (२००७), ए बी डीव्हिलियर्स (२०१५) – उपांत्य फेरी
संघाच्या सर्वाधिक धावा ४११/४ वि. आर्यलॅंड (२०१५)
निच्चांकी धावसंख्या १४९ वि. ऑस्ट्रेलिया (२००७)
सर्वाधिक धावा ए बी डी व्हिलियर्स – १२०७ (२००७ – २०१५)
सर्वोच्च धावा गॅरी कर्स्टन – नाबाद १८८ वि. युएई (१९९६)
सर्वाधिक शतक ए बी डी व्हिलियर्स – ४
सर्वाधिक सरासरी ए बी डी व्हिलियर्स – ६३.५२
सर्वाधिक मोठी भागिदारी डेविड मिलर व जे पी ड्युमिनी – २५६ वि. झिम्बाब्वे (२०१५)
सर्वाधिक बळी अॅलन डोनॉल्ड – ३८ बळी
सर्वाधिक झेल ग्रॅमी स्मिथ – १५ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत मार्क बाऊचर – ३१ बळी (झेल ३१ यष्टिचीत ०)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण अॅण्ड्रु हॉल – ५/१८ वि. इंग्लंड (२००७)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा जॅक कॅलिस (२००७) – ४८५ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी मॉर्ने मॉर्केल (२०१५) – १७ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल रिली रोसो (२०१५) – ९ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत डेविड रिचर्डसन (१९९२) – १५ बळी (झेल १४ यष्टिचीत १)

संघ:- फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), कागिसो रबाडा, डेल स्टेन, क्विंटन डी कॉक, हाशिम अमला, इम्रान ताहिर, जे पी ड्यमिनी, अॅडन मार्करम, डेविड मिलर, ख्रिस मॉरीस, लुंगी एन्गिडी, अॅडील फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, तबरैज शम्सी, वॅन डर ड्युसैन
३० मे २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
२ जुन २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
५ जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
१० जुन २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००
१५ जुन २०१९ वि. अफगानिस्तान सं. ६.००
१९ जुन २०१९ वि. न्युझिलंड दु. ३.००
२३ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
२८ जुन २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
६ जुलै २०१९ वि. ऑस्ट्रेलिया सं. ६.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment