वर्ल्ड कप टीम – इंग्लंड


क्रिकेटचे जन्मस्थान असलेल्या इंग्लंडमध्ये तब्बल ५ व्या वेळेस विश्वचषक स्पर्धा खेळविण्यात येत आहे. इंग्लंडची विश्वचषकातील कामगिरी पाहता इंग्लंडला तीन वेळेस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले पण त्यांना विश्वचषकावर आपले नाव कोरता आलेले नाही. २०१५ च्या विश्वचषकात इंग्लंडला फक्त दोन विजय मिळवता आले होते ते ही अफगानिस्तान व स्कॉटलंडविरुद्ध तर चार सामन्यांत पराभव पत्कारावा लागल्याने इंग्लंडला साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. पण २०१५ च्या विश्वचषानंतर इंग्लंडने शानदार कामगिरी केली आहे आणि २०१५ च्या विश्वचषकात साखळीत गारद झालेल्या इंग्लंडच्या संघाकडे मायदेशात होणाऱ्या २०१९ च्या विश्वचषकात विश्वविजेता म्हणुन पाहिले जात आहे. त्यामुळे मायदेशात खेळण्याचा किती फायदा इंग्लंडचे खेळाडु उठवतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

महत्त्वाचे खेळाडु:- इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जो रुट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स

आयसीसी क्रमवारीतील स्थान:- १

विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९७९, १९८७ आणि १९९२ मध्ये उपविजेतेपद
यशस्वी कर्णधार ब्रेडन मॅकलम (२०१५) – उपविजेतेपद
संघाच्या सर्वाधिक धावा ३९३/६ वि. वेस्ट इंडिज (२०१५)
निच्चांकी धावसंख्या ११२ वि. ऑस्ट्रेलिया (२००३)
सर्वाधिक धावा स्टिफन फ्लेमिंग – १०७५ (१९९६ – २००७)
सर्वोच्च धावा मार्टिन गुप्टील – नाबाद २३७ वि. वेस्ट इंडिज (२०१५)
सर्वाधिक शतक ग्लेन टर्नर, मार्टिन गुप्टील, नॅथन अॅस्टल, स्कॉट स्टायरिस व स्टिफन फ्लेमिंग – २
सर्वाधिक सरासरी ग्लेन टर्नर – ६१.२०
सर्वाधिक मोठी भागिदारी मार्टिन गुप्टील व ब्रेडन मॅकलम – १६६ वि. झिंबाब्वे (२०११)
सर्वाधिक बळी जेकब ओरम – ३६ बळी
सर्वाधिक झेल ख्रिस केर्न्स – १६ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत ब्रेडन मॅकलम – ३२ बळी (झेल ३० यष्टिचीत २)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण टिम साउदी – ७/३३ वि. इंग्लंड (२०१५)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा मार्टिन गुप्टील (२०१५) – ५४७ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी ट्रेंट बोल्ट (२०१५) – २२ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल नॅथन अॅस्टल (१९९९) – ६ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत ब्रेडन मॅकलम (२००७) – १४ बळी (झेल १३ यष्टिचीत १)

संघ:- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, जो रुट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मोईन अली, जेसन रॉय, टोम करन, लायम प्लंकेट, अदिल राशिद, मार्क वुड, जोफ्रा आर्चर, लायम डॉसन, जेम्स विन्स

३० मे २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००
३ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
८ जुन २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
१४ जुन २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००
१८ जुन २०१९ वि. अफगानिस्तान दु. ३.००
२१ जुन २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
२५ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया दु. ३.००
३० जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
३ जुलै २०१९ वि. न्युझिलंड दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment