तब्बल 28 हजारांनी स्वस्त झाला गुगलचा हा स्मार्टफोन


गुगलचा पिक्सल 3XL हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते. कारण पिक्सल 3XLच्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत कंपनीने तब्बल 28 हजार रूपयांची कपात केली आहे. त्याचबरोबर याच्या 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटच्या किंमतीतही तब्बल 26 हजारांची कपात केली आहे.

गुगलने पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल हे स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केले होते. यातील पिक्सल 3 एक्सएलच्या 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 83,000 रुपये होती, तर 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेजची किंमत 92,000 रुपये होती. पण हे दोन्ही व्हेरिअंट्स ग्राहकांना आता किंमतीत कपात झाल्याने अनुक्रमे 54,999 रुपये आणि 65,999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Leave a Comment