लोकसभेत वेगवेगळ्या जागी बसणार सनी आणि हेमामालिनी


यंदाच्या लोकसभेत भाजपच्या तिकिटावर बॉलीवूड अभिनेत्री, बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा अभिनेता सनी देओल दोघेही निवडून आले आहेत. या दोघांनीही प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या मतांनी विजय मिळविला आहे. हेमामालिनी मथुरा मतदारसंघातून तर सनी पंजाब मधील गुरुदासपूर मतदारसंघातून संसदेत गेले आहेत. मात्र हे दोघे एकाच पक्षाचे खासदार असले तरी लोकसभा सभागृहात जवळ जवळ बसणार नाहीत.

सनी देओल आणि हेमामालिनी याच्यात कसे संबंध आहेत याची चर्चा अनेकदा झाली आहे. एका मुलाखतीत प्रथमच त्या संदर्भात बोलताना हेमा मालिनी यांनी त्यांना गरज असेल तेव्हा सर्वप्रथम सनी त्यांच्यासोबत असतो असा खुलासा केला होता. लोकसभेत शेजारी सीटवर दोघे बसू न शकण्याचे कारण मात्र वेगळेच आहे. हेमामालिनी या धर्मेंद्र याच्या दुसर्या पत्नी आहेत व त्यामुळे सनी व हेमा याच्यातील संबंध तणावाचे असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा लोकसभेत वेगवेगळ्या जागेवर बसण्याशी काही संबंध नाही.

संसदेत हेमामालिनी या दुसऱ्या वेळी खासदार बनल्या आहेत तर सनीची खासदार बनण्याची ही पहिली वेळ आहे. हेमामालिनी सिनिअर खासदार असल्याने त्यांना संसदेत पुढच्या रांगात जागा दिली जाईल तर सनी नवीन असल्याने त्याची जागा संसदेतील मागच्या रांगेत असेल. सनीने लोकसभा निवडणूक काळातच भाजप मध्ये प्रवेश केला आणि त्याच्यावर विश्वास ठेऊन पक्षाने त्याला पंजाब गुरुदासपूर मधून तिकीट दिले. हा मतदारसंघ दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा होता. सनीने तेथे वारंवार दौरे करून लोकांचा समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले असून येथील मतदारांनी त्याला भरभरून मतदान केले.

Leave a Comment