'खामोशी'साठी गाणे गाणार श्रृती हसन - Majha Paper

‘खामोशी’साठी गाणे गाणार श्रृती हसन


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि प्रभूदेवा यांचा हॉरर थ्रिलर असलेला ‘खामोशी’ हा चित्रपट येणार असून काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना या चित्रपटाचा थरारक टीजर पाहायला मिळाला. आता समोर मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रृती हसन ही एक गाणे गाणार आहे.

अभिनयाव्यतीरिक्त गायनातही श्रृती हसन ही अग्रेसर आहे. १९९७ साली आलेल्या ‘चाची-४२०’ या चित्रपटापासूनच तिच्या गायनाची सुरुवात झाली आहे. तिचे वडील कमल हसन यांनी या चित्रपटात भूमिका साकारली होती. बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांसाठी श्रृतीने गाणे गायले आहे. यापैकी ‘तेवर’ चित्रपटातील ‘ ‘जोगनीया’ हे गाणे सुपरहिट झाले होते. तिच्या ‘सन्नाटा’ या गाण्यालादेखील प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला होता.

श्रृतीने ‘खामोशी’ चित्रपटातील गाण्याविषयी आपला अनुभव शेअर केला आहे. प्रभूदेवा यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटात मी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या चित्रपटासाठी आता मला गायनाची संधी मिळत असल्याने मी फार आनंदी आहे. तमन्ना ही देखील माझी चांगली मैत्रीण असल्याचे तिने एका माध्यमाशी बोलताना सांगितले. ‘खामोशी’ चित्रपटाच्या थीमवरच आधारित हे गाणे राहणार आहे.

Leave a Comment