टीव्हीएसच्या नव्या बाईकचा धोनी पहिला ग्राहक


नवी दिल्ली – आपली फ्लॅगशिप बाइक अपाचे RR 310ला टीव्हीएसने नव्या अवतारात लाँच केले आहे. बाइकमध्ये थोड्याफार प्रमाणात मॅकेनिकल आणि कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. नव्या बाइकमध्ये स्लिपर क्लच देण्यात आला आहे. त्याचबरोबर नव्या ‘फँटम ब्लॅक’ रंगातही ही बाइक उपलब्ध असणार आहे. यापूर्वी ही बाइक केवळ सामान्य काळ्या रंगात उपलब्ध होती. नव्या रंगात वेगळी फिनिशींग आणि लाल-पांढऱ्या रंगाची स्ट्रिप आहे. बाइकमध्ये अन्य कोणताही बदल याव्यतिरिक्त करण्यात आलेला नाही. ही बाइक कंपनीच्या ठराविक डिलरशीपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या बाइकचा क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी पहिला ग्राहक ठरला. रेसिंग रेड कलरमधील बाइक धोनीने घेतली.

312.2 cc लिक्विड-कूल्ड इंजिन फुल फेअर्ड शार्प स्टाइल असलेल्या या बाइकमध्ये असून 33.52 bhp पावर आणि 27.3 Nm टॉर्क हे इंजिन जनरेट करते. इंजिन स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. बाइक स्लिपर क्लचमुळे वेगात चालवत असतानाही पटकन आणि सहजतेने गिअर चेंज करता येतात. ड्युअल चॅनल एबीएस फीचर देखील आहे. बाइकचा टॉप स्पीड 160 किलोमीटर प्रतितास एवढा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 7.17 सेकंदात ही बाइक 0 ते 100 किलोमीटर प्रतितास एवढा वेग पकडू शकते. यामध्ये मोठा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर याशिवाय लॅप टाइमर, रेस डायग्नोस्टिक्स सिस्टिम, स्पीड रेकॉर्डर आणि लॉंच टाइम रेकॉर्डर अशा सुविधा आहेत. या नव्या बाइकची एक्स-शोरुम किंमत 2.27 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment