सचिन, विराट यांच्या बड्या चाहत्यांना मिळणार अॅवॉर्ड


क्रिकेटचा भगवान मास्टरब्लास्टर सचिन तेंदुलकरचा सर्वात बडा चाहता सुधीरकुमार गौतम आणि विराट कोहलीचा सर्वात बडा चाहता सुकुमार कुमार याच्यासह अन्य तीन जणांना यंदा विश्वकप अंतिम फेरीच्या सामन्यात ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. १४ जून रोजी मँचेस्टर येथे वर्ल्ड कप अंतिम सामना होणार आहे. सचिन तेंडूलकर याने सुधीर कुमारचे होत असलेल्या सत्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

सुधीर आणि सुकुमार याच्यासोबत पाकिस्तानचे सर्वात मोठे प्रशंसक चाचा क्रिकेट उर्फ अब्दुल जलील, बांगलादेशचे प्रशंसक टायगर एका शोएब अली आणि श्रीलंकेचे सर्वात मोठे चाहते गायान सेनानायाके यानाही हे अॅवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे. चाचा क्रिकेट अब्दुल जलील हे सर्वात वयोवृद्ध आणि अनुभवी असून १९६९ च्या लाहोर येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट सामान्यनंतर जगभर सर्वत्र पाकिस्तान संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व सामान्यांना उपस्थिती लावली आहे. सुधीर कुमार त्यांच्या अंगावर सचिन तेंडूलकर अशी अक्षरे रंगवून सचिनचा प्रत्येक सामना मग तो जगात कुठेही असला तर उपस्थित राहत असत.

क्रिकेट चाहता बनणे हे सोपे काम नाही. जगभर कुठेही सामन्याला उपस्थित राहताना कधी कुणी तिकिटासाठी पैशाची मदत देतेही पण अनेकदा हे चाहते स्वतः कष्ट करून साठविलेले पैसा वापरून आपला आवडता खेळाडू अथवा संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जागोजागी उपस्थित राहतात. चाचा क्रिकेट म्हणतात हा सन्मान म्हणजे आमच्यासाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डच आहे. प्रथमच अशी अॅवॉर्ड दिली जात असून भारताची सर्वात मोठी फॅन कम्युनिटी इंडिअन स्पोर्ट्स तर्फे दिली जाणार आहेत. भविष्यात अशी अॅवॉर्ड अन्य खेळाच्या चाहत्यांसाठीही सुरु केली जाणार असल्याचे संस्थेने जाहीर केले आहे.

Leave a Comment