चुकीचे वागणार नाही शपथ घे- स्मृती इराणी


२१ वर्षीय अभयसिंग याच्या डोक्यावर हात ठेऊन माझी शपथ घे, तू काहीही चुकीचे वागणार नाहीस, तू तुझे वडील गमावले आहेस तसाच मी माझा मोठा भाऊ गमावला आहे या शब्दात भाजप खासदार स्मृती इराणी यांनी अमेठीतील त्यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते सुरेंद्रकुमार याच्या मुलाची समजूत घातली. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पराभूत करून अमेठीतून विजयी झालेल्या भाजपच्या स्मृती इराणी यांना विजयाचा आनंद पुरेपूर उपभोगण्यापूर्वीच त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेंद्रसिंग यांच्या हत्येची खबर ऐकावी लागली आणि ही बातमी समजताच तातडीने दिल्लीहून अमेठी मध्ये दाखल झालेल्या स्मृती इराणी यांचे अमेठीशी किती जिव्हाळ्याचे नाते जडले आहे याची झलक दिसली.

सुरेंद्रसिंग यांचे शव दिसताच स्मृती गहिवरल्या आणि सुरेंद्रसिंग याच्या शवावर डोके ठेऊन त्यांनी शेवटचे दर्शन घेतले. सुरेंद्रकुमार निवडणुकीची सर्व जबाबदारी संपवून आणि स्मृती यांच्या विजयाचे श्रेय अनुभवून घरी आले आणि रात्री झोपेतच त्यांच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली गेली. स्मृती अमेठीत आल्या तेव्हा लोकांना राग अनावर झाला होता मात्र स्मृती यांनी थेट घरात जाऊन मुलाची समजूत काढली, त्याला हाताला धरून बाहेर आणले आणि चल, आपण त्यांना खांदा देऊ असे सांगून मयतीला खांदा दिला. हिंदू रिवाजप्रमाणे त्यांनी स्मशान मार्गावर ५ वेळा जमिनीवर तिरडी टेकविली आणि स्मशानात पोहोचेपर्यंत पूर्ण वेळ प्रेतयात्रेत खांदा दिला.

सुरेंद्रकुमार यांच्या आईचे सांत्वन करताना स्मृती यांनी आजपासून मी तुमचा मुलगा असा धीर दिला तर पत्नीचे सांत्वन करताना तिला जवळ घेतले आणि धीर दिला. त्याच्या लग्न झालेल्या लेकीना जवळ घेऊन तुमच्या वडिलांची दीदी सतत तुमच्यासोबत आहे असे सांगितले तर भाऊ नरेंद्र यांना मी तुमची बहिण असे समजावले. सुरेंद्र यांचे शव पाहताच त्यांचे डोळे अश्रुनी भरून गेले आणि क्षणभर त्यांना तोंडातून शब्द फुटला नाही. त्यांनी सुरेंद्र यांच्या पायावर डोके ठेऊन अश्रुना वाट मोकळी करून दिली. यामुळे सर्वच वातावरण भारावले गेले होते.

Leave a Comment