सुरेंद्र सिंहच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची स्मृती इराणींचे आश्वासन


अमेठी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. स्मृती इराणी यावर म्हणाल्या, मी आणि सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांनी सुरेंद्र सिंह यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत.

स्मृती इराणी अंत्यसंस्कार झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, माझी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे. मी या गोष्टीचा सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबासमोर संकल्प केला आहे. दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मी त्यांना दिले आहे.

सुरेंद्र सिंहाच्या पार्थिवाला स्मृती इराणी यांनी खांदा दिला. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विवाह समारंभ सुरेंद्र प्रताप सिंह उरकून आले होते. घराच्याबाहेर ते झोपले असताना एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने अचानक गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गंभीर अवस्थेत असलेल्या सुरेंद्र यांना रायबरेली येथील रुग्णालायत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ट्रॉमा सेंटरला नेण्यास सांगितले. परंतु, वाटेतच सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment