ह्युंदाई लाँच करणार एकदा चार्जिंग केल्यानंतर 300 किमी धावणारी कार


येत्या 9 जुलै रोजी नवी कोना ईव्ही ही इलेक्ट्रिक एसयुव्ही कार ह्युंदाई मोटर इंडिया भारतात लाँच करणार आहे. भारतातील या कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक ब्रँड असून, साधारण 25 लाख रुपये अशी त्याची किंमत राहू शकते. 39.2 kWh ची बॅटरी कंपनी या कारमध्ये देणार असल्याची माहिती आहे.

एकदा फुल चार्ज केल्यानंतर 482 कि.मी. 64 kWh बॅटरी असलेले मॉडेल धावेल आणि एकदा फुल चार्ज केल्यानंतर 39.2 kWh बॅटरी असलेले माडेल 312 कि.मी. एवढे मायलेज देईल, असा दावा ह्युंदाईने केला आहे. ही बॅटरी तासाभरात 80 टक्के चार्ज होते, असे कंपनीने म्हटले आहे. त्यासाठी तिला 100kW DC फास्ट चार्जरने सप्लाय द्यावा लागेल.

ह्युंदाई कोना ईव्हीमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हील, डिजिटल डॅशबोर्ड, 7 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन सेंटरिंग सिस्टिम, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि ऑटोमॅटिक इमरर्जंसी ब्रेक अशी फीचर्स देण्यात आली आहेत. या इलेक्ट्रिक एसयुव्हीला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले असल्याची माहिती आहे. 100 कि.मी.चा वेग घेण्यासाठी ह्युंदाईच्या कोना ईव्हीला 9.3 सेकंद लागतात.

Leave a Comment