अमुलच्या जाहिरातीत झळकली मस्तानी आणि पारो


दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात आघाडीवर असलेली ‘अमूल’ कंपनी ही आपल्या सामाजिक विषय आणि ताज्या घडामोडींवर भाष्य करणारे हटके कार्टून स्वरुपातील जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी देखील ओळखली जाते. वाचकांनाही या कंपनीच्या नव्या कार्टून पोस्टरसाठी प्रतीक्षा असते. अमूलने आता त्यांचे एक नवे कार्टून पोस्टर रिलीज केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या पोस्टवर हटके अंदाजात दिसत आहे.


अमूलचे कार्टून पोस्टर दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहे. दीपिकाने या पोस्टरमध्ये कान्स महोत्सवादरम्यान परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे सोनेरी रंगाचा गाऊन ऐश्वर्याने परिधान केला आहे. तसेच दोघींच्याही हातात ब्रेडची स्लाईस असल्याचे दिसत आहे. ‘गोरी तेरा गाऊन बडा न्यारा’ अशी टॅग लाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांना प्रचंड आवडले आहे.

Leave a Comment