हत्येसारख्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पुनाळेकरांवर कारवाई होणे आवश्यक – गुणरत्न सदावर्ते


मुंबई – दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये संजीव पुनाळेकर याचे नाव असल्यामुळे आमच्या व्यवसायावर नामुष्की ओढवली आहे. संपूर्ण व्यवस्था हिंदुत्ववादी शक्तींनी हातात घेतली आहे. हत्येसारख्या गुन्ह्यात पुनाळेकर सहभागी आहे, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. पण ही कारवाई कोण करणार हा प्रश्न आहे. पण संघर्ष चालू ठेवावा लागेल अन्यथा संविधान हे लोक नेस्तनाबूत करतील, असा आरोप प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आरआर पाटील गृहमंत्री असताना झाली होती. एक रिपोर्ट गृहमंत्रालयात सादर करण्यात आला होता. त्या रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की केंद्राची जबाबदारी आहे. परंतु, त्यानंतर सरकार बदलले. ज्याप्रकारे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिला खासदार केले. त्याचप्रमाणे उद्या पुनाळेकर यांना गृहमंत्री केले तर काही नवल वाटणार नाही, असे सदावर्ते यांनी सांगितले.

Leave a Comment