मॅकडोनाल्डचे मधमाशी रेस्टॉरंट


मॅकडोनाल्ड या अमेरिकन फूड चेनने भारतात बर्गर लोकप्रिय केले असे म्हटले तर ते चुकीचे नाही. युवा वर्गाचे लोकप्रिय हन्गिंग औट ठिकाण बनलेल्या मॅकडोनाल्डची भारतातच नाही तर जगभरात अनेक रेस्टॉरंट आहेत. या फूडचेन ने एक अनोखा प्रयोग नुकताच राबविला असून तो आहे मधमाशी संरक्षणाचा. जगात अनेक प्रकारचे किडे आणि कीटक आहेत त्यात मध्माशीचा समावेश आहे. मात्र गेली काही वर्षे या मधमाश्या संकटात असून त्यांची संख्या लक्षणीय रित्या कमी होत चालली आहे. परिणामी अनेक प्रकारची झाडे झुडपे आणि फुलझाडेही नामशेष होऊ लागली आहेत. कारण परागीकरणाचे महत्वाचे कार्य या मधमाश्या पार पाडत असतात आणि त्यांची संख्या घटत चालल्याने ही झाडे वनस्पती संकटात आले आहेत.


यावर उतारा महानु मधमाशी वाचवा अभियान जगभरात हाती घेतले गेले असून मॅकडोनाल्डने त्यात त्यांचा सहभाग अनोख्या पद्धतीने नोंदविला आहे. स्वीडन मध्ये या कंपनीने मधमाश्यांसाठी एक युनिक मिनी औटलेट सुरु केले आहे. मॅकहाइव्ह असे त्याचे नामकरण केले गेले असून हे औटलेट झाडेझुडपे, भरपूर गवत असलेल्या फुलझाडांच्या मैदांनावर आहे. त्याचे डिझाईन करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या आहेत. म्हणजे त्यात किती उजेड हवा, सूर्यप्रकाश किती यावा, अंधार किती हवा हे ठरवून त्याप्रमाणे त्याची उभारणी केली आहे. येथे मधमाश्यांना त्यांचे पोळे बांधण्यात काही अडचण नाही असे सांगितले जात आहे.

आजकाल झाडाझुडपांवर फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे मधमाश्या मरतात. युरोपीय देशात या कीटकनाशाकावर सध्या बंदी घातली गेली आहे. मधमाश्या संरक्षणासाठी अनेक उपाय केले जात आहेत त्यात मॅकडोनाल्डने हातभार लावताना जगातील हे सर्वात चिमुकले रेस्टॉरंट तयार केले आहे. त्यावर कंपनीची सोनेरी नाममुद्रा आहे. स्वीडन मधील अनेक मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटच्या रुफटॉपवर मधमाश्या पालनाची सोयही केली गेली आह

Leave a Comment