आपल्या मैत्रीणीला चक्क सक्रिय ज्वालामुखीवर जाऊन घातली लग्नाची मागणी


ओटावा(कॅनडा)- कोणत्याही व्यक्तीसाठी ज्वालामुखीवर चढणे अत्यंत रोमांचकारी अनुभव असतो. कॅनडाचा रहिवासी असलेला जॅरड तो रोमांच अनुभवण्यासाठी आपल्या मैत्रीणीसोबत येथे आला होता. त्याने येथे आल्यावर केलेल्या एका युक्तीने आश्चर्यचा धक्काच त्याच्या मैत्रीणाला बसला. जॅरडने ज्वालामुखीजवळ पोहचल्यावर मैत्रीण एलिसनला लग्नाची मागणी घातली.

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाच्या टूअरवर जॅरड आणि एलिसन आले होते. त्यामुळे माउंट ब्रोमोच्या ज्वालामुखीवर जाण्याचा निर्णय दोघांनी घेतला. सोबत 7600 फुट ऊंच असलेला पर्वत सर करायला दोघांनी सुरूवात केली. ज्वालामुखीच्या कडेवर पोहचताच, जॅरड गुडघ्यावर बसला आणि एंगेजमेंट रिंग काढून एलिसनला लग्नाची मागणी घातली, एलिसन हे ऐकून थोडी गोंधळली पण स्वतःला सावरून तिने लग्नाला होकार दिला.

ओटावामध्ये टीचर एजुकेशन प्रोग्राम या दोघांची पहिली भेट दरम्यान झाली होती. दोघांनाही फिरणे आणि ट्रॅकिंग खूप आवडते. एकमेंकाच्या आवडीमुळे लवकरच मैत्री झाली. ‘अव्हर मूव्हिंग रूट्सट नावाने सध्या दोघे ट्रॅव्हल ब्लॉग चालवतात. आपल्या प्रपोजलचा व्हिडीओ या दोघांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अपलोड केला आहे. जॅरेडने व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, माझ्या आयुष्यातील 6 फेब्रुवारी 2019, हा दिवस अविस्मरणीय क्षण आहे. पण अचानक मिळालेल्या या सप्रराइजमुळे एलिसन खूप आनंदी आहे.

तिला मी जेव्हा प्रपोज केले तिला तेव्हा एक धक्काच बसला कारण एकीकडे ज्वालामुखीतून धूर निघत होता आणि या बाजूने माझे प्रपोजल. एखाद्याचे अशा परिस्थितीत गोंधळणे साहजिक आहे. पण तिने काही सेकंदाने माझा प्रस्ताव स्विकार करून मला अलिंगन दिले. यानंतर आम्ही खाली उतरून आनंद साजरा केला. यासाठी आम्ही आमचे मित्र जेनी आणि स्तू यांचे आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच ओटावामध्ये आमची पहिली भेट झाली होती.

Leave a Comment