गुगल ड्यओच्या माध्यमातून ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये बोलता येणार 8 जणांशी


व्हिडीओ कॉलिंगसाठी गुगलचे गुगल ड्यओ हे अॅप बरेच लोकप्रिय आहे. व्हिडीओ कॉलसाठी सध्या व्हॉट्सअॅपचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचे फिचर व्हॉट्सअॅपकडून यापुर्वीच आणण्यात आले असल्यामुळे या स्पर्धेत आता गुगल ड्युओदेखील उतरले आहे. गुगल ड्यओने गेल्या महिन्यात ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर आणले होते. पण केवळ चार जणांना एकत्र व्हिडीओ कॉल तेव्हा करता येत होता. परंतू आता आलेल्या अपडेटमुळे आठ जणांच्या ग्रुपला व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध होणार आहे. हे फिचर सुरवातीला काही मोजक्या देशांमध्ये उपलब्ध होते. पण आता ते जगभरात उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये टेक्स्ट आणि इमोजीचा वापर करुन व्हिडीओ मेसेजेस देखील या पाठवता येणार आहेत.

या अॅपमध्ये ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसह ‘डेटा सेव्हिंग मोड’ हे नवीन फिचर आणण्यात आले आहे. यामुळे कमी मोबाईल डेटाचा वापर करुन व्हिडीओ कॉल करता येणार आहे. या अॅपच्या सेटिंग्स मेन्युमध्ये जाऊन डेटा सेव्हिंग मोड ‘ऑन’ करता येऊ शकतो. हे फिचर वापरण्यासाठी गुगल ड्युओ अॅप अपडेट करावे लागेल.

Leave a Comment