दरमहिन्याला जवळपास 10 हजार महिला युझर्स डाउनलोड करत आहेत छेडछाड थांबवणारे अॅप


टोकियो(जपान) – दिवसेंदिवस महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून म्हणून टोकियो पोलिसांनी महिलांसोबत छेडछाड करणाऱ्यांना रोखण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप बनवले आहे. जापानच्या महिलांची या अॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान येथील महिलांची अनेक वेळा छेडछाड होत होती, पण याबाबत त्यांना काहीच करता येत नव्हते. पण त्यांच्या सुरक्षेसाठी आता अँटी ग्रॉपिंग अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

महिला छेडछाड झाल्यावर डिजी पोलिस अॅपची मदत घेऊ शकतात, या अॅपद्वारे ‘स्टॉप इट’ (याला थांबवा) किंवा मोबाइलवर एसओएस (इमरजंसी कॉन्टॅक्टला सूचना) असा संदेश दिसतो. या संदेशात लिहलेले असते की, येथे एक मोलेस्टर (छेडछाड करणारा) आहे, कृपया मदत करा. पीडिता जवळपास असलेल्या लोकांचीही या संदेशाद्वारे मदत घेऊ शकते. पोलिस अधिकारी केइको टॉयमाइन यांनी सांगितले की, या अॅपला आपण 2.37 लाखपेक्षा अधिक वेळेस डाउनलोड करू शकता.

टॉयमाइन यांच्या माहितीनुसार, वेगाने या अॅपची लोकप्रियता वाढत आहे आणि दरमहिन्याला जवळपास 10 हजार महिला युझर्स हे अॅप डाउनलोड करत असल्यामुळे त्यामुळे कोणत्याही पब्लिक सर्विस अॅपच्या हिशोबाने हा निश्चितच मोठा आकडा आहे. त्यांनी सांगितले की, पीडीत महिला मदत मागण्यासाठी घाबरतात. पण, एसओएस संदेश मोडचा उपयोग करून इतर प्रवाशांना न सांगतासुद्धा छेडछाड करण्याऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देऊ शकतात.

टोकियो मॅट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या ताजा आकड्यानुसार, टोकियोमध्ये 2017 साली रेल्वे आणि सबवेवर जवळपास 900 छेडछाडीचे आणि इतर अत्याचाराचे घटना समोर आल्या आहेत. पण वास्तविक संख्या यापेक्षा जास्त असू शकते, कारण बऱ्याच वेळा याला बळी पडलेले लोक समोर येत नाहीत. जापानमध्ये अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला सहा महिन्याचा कारावास किंवा 5 हजार 500 डॉलर (3.83 लाख रूपये) पर्यंत दंड देण्यात येतो. अत्याचार किंवा धमकावल्यावर 10 वर्षांपर्यंत शिक्षा देण्याची तरतूद आहे.

Leave a Comment