शाओमीचे मी सनग्लासेस भारतात मिळणार


शाओमीने गेल्या डिसेंबर मध्ये भारतात लाँच केलेले सनग्लासेस आता भारतात मिळू शकणार आहेत. दोन व्हरायटी मधले हे सनग्लासेस कंपनीने भारतात क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर सादर केले होते ते आता मी इंडिया इ स्टोर्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. मी पोलोराइज्ड स्क़ेअर आणि मी पोलोराइज्ड पायलट अश्या दोन प्रकारात ते उपलब्ध आहेत. त्याच्या किमती अनुक्रमे ८९९ रुपये (एमआरपी ९९९ रुपये) आणि १०९९ रुपये( एमआरपी ११९९ रुपये) अश्या आहेत.


कंपनीने असा दावा केला आहे कि या दोन्ही सनग्लासेस साठी स्पेशल ग्लास लेन्स वापरले गेले असून त्यामुळे व्हीज्यूएलिटी खूपच उच्च दर्जाची आहे. पोलोराइज्ड लेन्स सह ओ ६ लेअर्ड लेन्स तंत्रज्ञान यात वापरले गेले असल्याने तीव्र प्रकाश, पोलोराइज्ड लाईट व हानिकारक युव्ही किरण डोळ्यांना संरक्षण देतात. युव्हीए, युव्हीबी, व्यूव्हीसी किरणांपासून १०० टक्के संरक्षण मिळते. स्क्रॅच रेसिस्टंट लेन्स मुळे डोळ्यावरचा ताण कमी होतो.

मी पोलोराइज्ड स्क़ेअर साठी फ्लेक्सिबल टीआर९० फ्रेम तर पोलोराइज्ड पायलट साठी युनिव्हर्सल साईज फ्रेम दिली गेली आहे. दोन्हीसाठी ६ महिने वॉरंटी असून दोन्ही १८ ग्रॅम वजनाच्या आहेत. ब्ल्यू आणि ग्रे मध्ये हे सनग्लासेस उपलब्ध आहेत.

Leave a Comment