काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला राहुल गांधींचा राजीनामा


नवी दिल्ली – आज दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. राहुल गाधींनी या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. मात्र, तो कार्यकारिणीने फेटाळून लावला. राहुल गांधींचे नेतृत्वच सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसला उभारी देऊ शकते, असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशातील लोकशाही धोक्यात आली असून या प्रवृत्तीला काँग्रेस नेहमी विरोध करत राहील. काँग्रेसचा पराभव हा विचारांचा पराभव नसून केवळ जागांच्या आकडेवारीचा पराभव आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांनी यशस्वीपणी सांभाळली आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

देशभर फिरून राहुल गांधी यांनी प्रचार केला. त्यांनी तळापर्यंत काँग्रेसचे विचार पोहचवले. देशातील समस्यांचा त्यांना अभ्यास झाला आहे. शिवाय त्यांना काँग्रेसच्या संघटनाची रणनितीही उत्तम माहिती झाली आहे. राहुल गांधींचा राजीनामा घेऊन नविन व्यक्तीला अध्यक्ष निवडल्यास त्या व्यक्तीला पुन्हा ५ वर्षे काँग्रेस कार्यप्रणाली समजण्यास लागतील. त्यामुळे राहुल गांधीच अध्यक्षपदावर राहतील, असे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार नसून खोटा प्रचार करून भाजपने देशाची दिशाभूल केली आहे. देशातील कोट्यावधी मतदारांनी आमच्यावरही विश्वास टाकला. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, असे जेष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी सांगितले.

Leave a Comment