नवीन संसदेत नारी शक्ती बुलंद - Majha Paper

नवीन संसदेत नारी शक्ती बुलंद


नुकत्याच पार पडलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकात यंदा नारी शक्ती अधिक बुलंद झाल्याचे पहायला मिळत आहे. या वर्षी संसदेत ७६ महीला खासदार त्याच्या त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार असून यंदा ७२३ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. स्वतंत्र भारताच्या लोकशाही इतिहासात महिला खासदारांची संख्या प्रथमच ७६ वर गेली आहे. त्यापैकी २८ महिल्या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. २०१४ मध्ये ६६३ महिला निवडणूक रिंगणात होत्या आणि त्यातील ६६ संसदेत पोहोचल्या होत्या.


उत्तर प्रदेशातून निवडून आलेल्या महिला खासदारांची संख्या २०१४ मध्ये १३ होती ती यंदा घटून १० वर आली आहे. त्यात भाजपच्या ८ खासदार असून स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांना पराभूत करून मिळविलेला विजय विशेष महत्वाचा ठरला आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व ८ महीला खासदार करणार आहेत त्यातील ६ भाजपच्या असून २०१४ मध्ये ६ महीला खासदार होत्या. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यंदा तिसऱ्या वेळी बारामती मधून विजयी झाल्या आहेत.


बिहार मधून ३ तर प.बंगाल मधून ९ महिला निवडून गेल्या आहेत. बिहारच्या तिन्ही महिला खासदार भाजपच्या आहेत तर प. बंगालमध्ये २ भाजप महिला खासदार निवडून आल्या आहेत. गुजराथ मध्ये ५, मध्यप्रदेशात ४ महिला खासदार आहेत त्यात भोपाल मधून दिग्विजयसिंग यांना हरवून निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग याचा विजय महत्वाचा मनाला जात आहे. भाजपने ५३ तर कॉग्रेसने ५४ महिला उमेदवारांना तिकिटे दिली होती त्यात भाजपच्या ३८ तर कॉंग्रेसच्या ६ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

यंदा मतदान हक्क बजावणारया महिला मतदारांची टक्केवारीही वाढली असून १३ पैकी ११ राज्यात महिला मतदार टक्केवारी ६० टक्क्यावर गेली आहे. मध्यप्रदेशात ही टक्केवारी ६८ इतकी आहे.

Leave a Comment