उद्योगपतीने अशी सजवली त्याची कार


मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर मधील उद्योजक दातूक सेरी यांनी त्यांची जग्वार एस टाईप कार अनोख्या पद्धतीने सजविली असून हा उद्योग करताना त्यांनी बालपणीच्या छंदाची जोपासनाही केली आहे. दातूक यांनी त्यांची खरी कार सुमारे साडेचार हजार हॉटव्हील्स टॉय कार्स चिकटवून सजविली आहे. त्यामुळे त्याच्या कारला नवा लुक आला आहे पण ही कार कुठेही बिनधास्त पार्क करण्याची सोय मात्र त्यांना राहिलेली नाही.


दातूक यांना वयाच्या १३ व्या वर्षीपासून हॉटव्हील्सच्या खेळण्यातील कार साठविण्याचा छंद होता आणि तेव्हापासूनच्या या सर्व कार त्यांनी सांभाळून ठेवल्या आहेत. दातूक फायनान्शियल जीनियस ग्रुप या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांच्या संग्रही ५ हजाराहून अधिक खेळण्यातल्या कार्स आहेत. त्या सर्व कार्सची रोज देखभाल करणे अवघड काम आहे त्यामुळे या कार्स एकाच गाडीवर चिकटवाव्या अशी कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी जग्वार एसवर या कार्स ग्लूने चिकटविल्या. यामुळे त्याच्या गाडीचे स्वरूप एकदम बदलले आणि रंगीबेरंगी रूप मिळालेली ही खरी कार आणि तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

दातूक म्हणतात यात माझा फॅशन सेन्स ही दिसून येत आहे. माझे व्यक्तीमत्व त्यातून प्रतीत होते आहे. अर्थात या नटविलेल्या कारची देखभाल सोपी नाही आणि ते ती कुठेही पार्क करू शकत नाहीत कारण चिकटविलेल्या खेळण्यातल्या कार चोरीला जातील अशी भीती आहे. दातूक म्हणतात ज्याला लोकांचे लक्ष्य वेधून घ्यायचे आहे त्याने असे प्रयोग करायला हवेत.

Leave a Comment