मोदी आणि त्यांच्या साठी करिश्माई ठरलेला ८ नंबर


यंदाच्या निवडणुकीत देशात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आल्याचे लोकसभेचे निकाल सांगत असतानाच अंक तज्ञ म्हणजे न्यूमीरॉलॉजिस्ट मोदी आणि त्याच्यासाठी लकी असलेला आठ आकडा पुन्हा एकदा कसे जुळून आले याचे पुरावे देत आहेत. निवडणूक निकाल अंतिम टप्प्यात आहेत आणि भाजपने स्वतःच्याच ३०० जागा मिळविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे रोजी सरकार स्थापनेचा दावा करून नंतर पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

आकडेतज्ञ आणि ज्योतिषी मोदींसाठी ८ हा आकडा कसा लकी आहे याची उदाहरणे देऊ लागले असून २६ मे या तारखेतील २६ या दोन अंकांची बेरीज ८ आहे या कडे लक्ष वेधत आहेत. मोदींना मिळालेल्या विजयात हा नंबर महत्वाचा असल्याचा दावा केला जात आहे. मोदींनी २०१४ मध्ये वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला ती तारीख २६ एप्रिल होती आणि मोदींचा जन्मदिनांक १७ म्हणजे पुन्हा ८ नंबर आणि पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली ती तारीख २६ मे २०१४. इतकेच नव्हे तर १७ व्या लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि बालाकोट येथील हवाई हल्ल्याची तारीख आहे २६ फेब्रुवारी म्हणजे पुन्हा ८.


मोदी यांनी प्रत्येक नवीन निर्णय घेतला तो ८ नंबरचा आधार घेऊनच. देशात नोटबंदी मोदींनी जाहीर केली ती ८ नोवेंबरला आणि ही घोषणा केली गेली रात्री ८ वाजता. ८ हा नंबर भगवान कृष्ण आणि शनिदेव यांचा मुलांक मानला जातो. अंकशास्त्रात प्रत्येक अक्षरासाठी ठराविक नंबर असतो. जगातील लीडिंग न्यूमेरॉलॉजिस्ट बफेलो येथील पॉल साडोव्ह्सकी यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी या नावातील अक्षरांची त्यांच्या नंबरनुसार बेरीज केली तर ती ६२ म्हणजे ८ येते.


मोदींच्या एकूण काराकीर्दीतील महत्वाच्या घटना पहिल्या तर ८ नंबरचा योग ठळक दिसून येतो. त्यांनी गुजराथ मध्ये विक्रमी चौथ्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती २६ डिसेंबर रोजी. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी प्रचार सुरु केला तो २६ मार्च पासून. प्रवासी भारतीय दिवस घोषणा केली ती ८ जानेवारी २०१५ ला. प्रधानमंत्री मुद्रा योजना जाहीर केली ती ८ एप्रिल रोजी. दूरदर्शन किसान पहिला टीव्ही चॅनल जो, खास शेतकरी बंधुंसाठी सुरु होता त्याचे उद्घाटन केले ते २६ मे २०१५ रोजी. डिजिटल इंडियाची घोषणा झाली ती २६ सप्टेंबर २०१५ रोजी.

मोदींनी स्वावलंबन अभियानाची घोषणा केली ती १७ सप्टेंबर २०१४ रोजी. इतकेच नव्हे तर सार्क परिषदेचे उद्घाटन त्यांनी केले ते २६ नोव्हेंबर २०१४ ला. मिळालेल्या माहितीनुसार ही तारीख मोदी यांना विचारूनच ठरविली गेली होती. दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान ७ रेसकोर्सचे नाव बदलून ते ७ लोककल्याण मार्ग असे ठेवले गेले आणि योगायोग असा कि या नावाच्या अक्षरांच्या नंबरप्रमाणे ही बेरीज ८ येते. ७ रेसकोर्सची बेरीज येते ६. ज्योतिषांच्या मते ८ मुलांक किंवा लकी नंबर असणाऱ्या व्यक्ती महत्वाकांक्षी, ठरविलेल्या ध्येयाच्या दिशेने खंबीरपणे वाटचाल करणाऱ्या असतात.

Leave a Comment