सॅमसंग ६४ एमपी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणणार


कोरियन इलेक्ट्रोनिक जायंट सॅमसंगने ६४ एमपी कॅमेरा सेन्सर असलेल्या स्मार्टफोन साठी तयारी केली असून अश्या प्रकारचा हा जगातील पहिलाच फोन असेल असे सांगितले जात आहे. हा फोन ए ७० एस नावाने येईल आणि या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केला जाईल असे समजते. लिक झालेल्या रिपोर्ट नुसार हा फोन नुकत्याच लाँच झालेल्या ए ७० चे अपग्रेड व्हर्जन असेल. या रिपोर्ट नुसार सॅमसंग आयएसओ सीइएलएल ब्राईट जीडब्ल्यूआय कॅमेरा सेन्सर्स वापरेल. काही महिन्यापूर्वी लाँच झालेल्या ए ७० मध्ये ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला होता. या नव्या कॅमेऱ्यातील सेन्सरची घोषणा काही दिवसापूर्वी केली गेली होती. हा कॅमेरा सेन्सर स्मार्टफोन ला हाय रेझोल्युशन देतो आणि तो सेन्सर पिक्सल मर्जिंग टेट्रासेल तंत्रज्ञान आणि रेमोसिक अल्गोरिदमसह येतो. त्यामुळे कमी प्रकाशात १६ एमपी इमेज ऑफर होते.

हा सेन्सर १०० डेसिबलपर्यंत रियल टाईम डायनामिक रेंज सपोर्ट करतो. हा फोन ड्युअल कन्व्हर्जन गेन (डीसीजी )ने युक्त असलेला प्रकाश इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये परावर्तीत करतो. कंपनीने काही महिन्यापूर्वी लाँच केलेला ए ७० साठी ६.७ इंची इन्फिनिटी सुपरएमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून नॉच मध्ये ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनची किंमत २८९९० रुपये असून ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज ते ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी ४५०० एमएएच बॅटरी, अँड्राईड ९.० पाय ओएस अशी त्याची फिचर आहेत.