या देशातून बलात्कारयाला दिल्या जातात कठोर शिक्षा


आज जगभरात रेप किंवा बलात्काराच्या घटना वाढत चालल्या असल्याचे दिसून येत आहे. आकडेवारी सांगते, प्रत्येक २४ मिनिटाला एक बलात्काराची घटना घडते आहे आणि त्यामानाने दोषी व्यक्तीला होणारी शिक्षा खूपच विलंबाने मिळते अथवा मिळत नाही. बलात्कार करणाऱ्या मध्ये परिचित लोकांचे प्रमाण अधिक आहे आणि असा गुन्हा करणाऱ्यांसाठी अश्या शिक्षा हव्यात कि पुन्हा तोच प्रकार करताना त्याने हजार वेळा विचार करायला हवा असे मत जगभरातील संघटना, संस्था, महिला आयोग व्यक्त करत आहेत. मात्र भारतात बलात्कार घडल्यावर गुन्हा दाखल झाला आणि न्यायालय प्रक्रिया दीर्घ काळ चालते आणि त्यामुळे अनेकदा अपराधी सुटतात किंवा अगदी मामुली शिक्षा त्यांना दिली जाते.


जगातील अनेक देश मात्र बलात्कार हा मोठा गुन्हा मानतात आणि तेथे शिक्षा देण्याचे प्रकार अघोरी म्हणावे असे आहेत. सौदी अरेबिया या कट्टर मुस्लीम देशात या गुन्ह्यासाठी मृत्युदंड आहे आणि तोही सहजासहजी दिला जात नाही तर दोषीला दगडाने ठेचून ठार केले जाते. म्हणजे गुन्हेगाराला यातनामय मृत्यू दिला जातो. चीन मध्ये हा गुन्हा करणाऱ्याला शिक्षाही त्वरित दिली जाते. येथेही बलात्कार केल्यास मृत्युदंड दिला जातो आणि तोही ताबडतोब.


ग्रीस मध्ये बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकून जनावरांप्रमाणे जखडून जन्मठेप भोगावी लागते. बलात्कारच नाही तर या देशात महिलेविरुद्ध छोटासा गुन्हा केला तरी अशीच शिक्षा दिली जाते. इराण मध्ये दोषीला फटके मारले जातात आणि जन्मठेप भोगावी लागते. पिडीत महिलेला प्रथम अब्रुनुकसानी मान्य करणार का असे विचारले जाते आणि तिने ते मान्य केले तर सार्वजनिक ठिकाणी दोषीला १०० फटके मारले जातात. शिवाय जन्मठेप दिली जाते. इजिप्त मध्येही बलात्कार करणाऱ्याला फाशी दिली जाते तर अफगाणीस्तान मधील कायदा अधिक कडक असून दोशीला सरळ मृत्युदंड दिला जातो. त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याला ठार केले जाते.

उत्तर कोरियामध्ये याच गुन्हासाठी एकाच शिक्षा असून दोषी व्यक्तीला डोक्यात एकापाठोपाठ एक बंदुकीच्या गोळ्या घातल्या जातात. भारताने नुकतेच १२ वर्षखालील मुलीवर बलात्कार झाल्यास गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

Leave a Comment