राज ठाकरेंच्या सभेमुळे झाला युतीचा विजय – विनोद तावडे


मुंबई – लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकता वर्चस्व स्थापन केले आहे. यात शिवसेनेने 18 जागांवर तर भाजपने 24 जागांवर घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान मिळवलेल्या विजया संदर्भात प्रतिक्रिया देताना राज्याचे शिक्षण मंत्री यांनी याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

विनोद तावडे यांनी एका आघाडी वर्तमानपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत मोदींना केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला त्याबरोबरच त्यांनी सर्व मतदारांचे आभार देखील मानले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूक ही युतीच्या माध्यमातून लढवली जाईल असे देखील यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी केलेला प्रचार निष्फळ ठरला असे देखील म्हटले आहे.

दरम्यान विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा देखील समाचार घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केलेला प्रचार शुन्यवत ठरला. तसेच राज ठाकरे यांनी करमणूक कर भरला पाहिजे कारण त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची सभांच्या माध्यमातून एक प्रकारची करमणूक केल्याची टीका त्यांनी केली. तसेच मुद्दे कोण मांडतो, त्याचे राज्यात वजन काय असे देखील सवाल त्यांनी उपस्थित केले. विनोद तावडे यांनी यावेळी राज ठाकरे यांचे आभार देखील मानले कारण त्यांच्या सभेमुळे विरोधकांना नाहीतर सत्ताधारी युती सरकारला झाला.

Leave a Comment