‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये झळकणार शाहरुख-कतरिना ?


पुर्वीच्या काळी येऊन गेलेल्या अनेक चित्रपटांचे रिमेक आता बॉलीवूडमध्ये होऊ घातले आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका फराह खान करणार आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटात कोण-कोणते कलाकार झळकणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता शाहरुख खान आणि कतरिना कैफ या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

फराह खाने नुकतीच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या रिमेकचा खुलासा केला होता. त्या दरम्यान कपिल शर्मा शोमध्ये कोणत्या चित्रपटाचा रिमेक करायला आवडेल असा प्रश्न मला पाच वर्षांपूर्वी विचारण्यात आला होता. मी त्यावेळी सत्ते पे सत्ता या चित्रपटाचे नाव घेतले होते. माझ्याकडे या चित्रपटाचे आता हक्क असल्याचे फराह म्हणाली.

दरम्यान या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार का असा प्रश्न फराहला विचारण्यात आला होता. फराहने त्यावर ‘मी सध्या याचे उत्तर देऊ शकत नाही. पण मी नेहमी सांगत असते मला माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये शाहरुखसोबत काम करायला आवडेल. परंतु आम्ही अजून चित्रपटाची कथा लिहिणाच्या प्रक्रियेत असल्याचे उत्तर दिले आहे.