इंग्लंडमध्ये दाखल झाला भारतीय क्रिकेट संघ


लंडन – आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय संघ दाखल झाला आहे. भारताचा विश्वचषक स्पर्धेत पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून होणार आहे.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत 1992 नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, तर 13 जून रोजी भारताला न्यूझीलंडशी दोन हात करावे लागतील. त्यानंतर 16 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल.

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Leave a Comment