मुंबईच्या पठ्ठ्याचा पाण्यात १.४८ मिनिटात ९ क्यूब सोडवण्याचा विक्रम


मुंबई – पाण्यात राहून ९ पिरॅमिन्स (पिरॅमिडच्या आकाराचे रुबिकचे क्यूब) सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड््समध्ये मुंबईच्या चिन्मय प्रभूने आपले नाव झळकवले आहे. चिन्मय या यशाबद्दल सांगताना म्हणाला, क्युबिंग आणि स्वीमिंग मला दोन्ही आवडतात. यामुळे काही नवे घडवून दाखवण्याचा विचार मनात आला. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून काही तरी नवे करण्याचा विचार केला. या आधी गिनीज बुकच्या लोकांकडे काही विक्रम झाला आहे का? याची विचारणा केल्यानंतर पाण्यात राहून सराव केला. हळूहळू श्वास रोखून धरण्याची वेळ वाढवली. पूर्वी ३० ते ३५ सेकंद पाण्यात श्वास रोखून उभा राहायचो. परंतु नंतर १ मिनिट ५० सेकंदांपर्यंत श्वास रोखण्यात यश मिळवले.

आता आपले कौशल्य चिन्मय इतरांनाही शिकवतो आहे. यासाठी त्याने काेचिंग देणेही सुरू केले आहे. चिन्मय सांगतो, आठवड्याच्या शेवटी क्लास घेतो. सर्वात लहान विद्यार्थी ४ वर्षांचा आहे. चिन्मयचे पिता प्रदीप प्रभू यांनी सांगितले, चिन्मय असा विक्रम करेल, असे वाटले नव्हते. त्याने क्युबिंग सुरू केली तेव्हा त्याची आवड पाहून मी त्याला प्रोत्साहन देत गेलो. नंतर त्याने कठोर मेहनत घेतली. त्याला या खेळात विक्रमी यश मिळाले, असे ते म्हणाले.

Leave a Comment