वाघोबा क्रिकेट मैदानावर आले आणि झाली एकच धावपळ


आता इंग्लंड मध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपची धमाल अनुभवण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्सुक झाले आहेत आणि त्याअगोदर क्रिकेट संदर्भातले अनेक किस्से चर्चेत येऊ लागले आहेत. क्रिकेट प्रेमी मोठ्या उत्साहाने असे किस्से एकमेकांशी शेअर करू लागले आहेत. त्यात मोठ्या स्पर्धातील किस्से जसे चघळले जात आहेत तसेच छोट्या स्पर्धातील किस्सेही आहेत.

असाच एक किस्सा सध्या चर्चेत आला असून ही हकीकत घडलीय २०११ मध्ये. तीही सदर्न इलेक्ट्रिकल क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये. डिव्हिजन मध्ये १ ला सामना हँपशायर क्रिकेट अकादमी आणि साउथ विल्त्स मध्ये सुरु होता आणि रोज बाउल नर्सरी मैदानावर तो खेळला जात होता. हा सामना एका वेगळ्या अनपेक्षित घटनेमुळे चर्चेत आला. झाले असे कि सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला वेगळेच दृश्य दिसले की सामना थांबवावा लागला. सुरक्षा रक्षक बोलवावे लागले आणि आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागली.


या वेळी हँपशायरच्या २५६ रन्स झाल्या होत्या आणि विरोधी गटाला विजयासाठी २५७ धावा करायच्या होत्या. त्यांना विजयासाठी ४३ चेंडूत २७ धावा काढायच्या होत्या पण तेवढ्या प्रेक्षकात आरडाओरड झाली आणि मैदानात पांढरा वाघ दिसत असल्याची चर्चा सुरु झाली. ताबडतोब मैदान सोडून खेळाडू पॅव्हेलीयन कडे गेले, पोलीस दल आले आणि त्यांनी मार्वेल प्राणीसंग्रहालयाची मदत मागविली. थर्मल इमेजिंग कॅमेरे स्टेडीयम मध्ये आणले गेले, वाघाला बेशुद्ध करणारे औषध आणले गेले आणि हेलीकॉप्टर मधून वाघाचा शोध सुरु झाला. इमर्जन्सी गेट उघडली गेली. तेथील परिस्थिती आणखी भयावह बनली कारण सीसीटीव्ही मध्ये वाघ दिसत होता.

अनेकांना याचे नवल वाटत होते कि इतका गोंधळ होऊन वाघ जागचा हलत का नाही? थर्मल इमेजिंग कॅमेऱ्यात वाघाच्या शरीराचे तापमान कमी दिसत होते. काही असले तरी पोलिसांना पुढे जाण्यावाचून पर्याय नव्हताच त्यामुळे पोलिसांनी धीर गोळा करून वाघाच्या दिशेने कूच केले. थोडे जवळ गेल्यावर त्यांना दिसले की हे वाघोबा म्हणजे स्टफ टॉय म्हणजे भुसा भरलेले खेळणे होते. अर्थात त्यामुळे प्रेक्षकांची भीती गेली तरी अर्धा तास सामना थांबवावा लागला होता. फॅक्टर्ड रन रेटवर साउथ विल्त्स टीमला विजयी घोषित केले गेले होते.

Leave a Comment