क्रिकेट मधील काही मनोरंजक माहिती


वर्ल्ड कप क्रिकेट सामने आता अगदी तोंडावर आले आहेत. त्या निमित्ताने क्रिकेट मधील काही मनोरंजक तरीही उपयुक्त माहिती खास आमच्या वाचकांसाठी देत आहोत. त्यात गोलंदाजांचे खास कर्तृत्व आहे तसेच फलंदाजांनी केलेली कमाल ही आहे.

जुन्या भारतीय टीम मधील स्पिनर बापू नाडकर्णी यांनी १२ जानेवारी १९६४ साली झालेल्या सामन्यात सलग २१ मेडन टाकल्या होत्या तर स्पिनर चंद्रशेखर यांनी टेस्ट मध्ये जेवढ्या धावा काढल्या त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या. सचिन तेंडूलकरने जेव्हा १९८९ मध्ये क्रिकेट पदार्पण केले त्यावेळीच अन्य २३ खेळाडूंनीही क्रिकेट पदार्पण केले होते. मात्र त्यातील सचिन आणि न्यूझीलंडचा क्रिस केयार्स सोडून कुणीही क्रिकेट मध्ये चांगले करियर बनवू शकले नाही.


२१ व्या शतकात भारताविरुद्ध जेवढी म्हणून मोठी शतके झळकावली गेली त्यात इशांत शर्माचा मोठा हात होता. त्याने २०११ मध्ये अजबेस्टन येथे एलीस्टर कुकचा कॅच सोडला आणि त्याने २९४ धावा कुटल्या. सिडनी येथे २०१२ साली इशांतने मायकेल क्लर्कचा कॅच सोडला आणि त्याने ३२९ धावा कुटल्या तर २०१४ मध्ये वेलिंग्टन येथे त्याने एलीस्टर मॅकुलमचा कॅच सोडला आणि मॅकुलमने ३०२ धावा कुटल्या.


विराट आल्यापासून भारताने ५ वेळा ३०० धावाच स्कोर चेस केला आहे तर सौरव गांगुली उर्फ दादा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने सलग चार वेळा मॅन ऑफ द मॅच मिळविले आहे. वीरेंद्र सेहवाग ने टी२० मध्ये सर्वाधिक ११९ धावा काढल्या आहेत, वन दे मध्ये सर्वाधिक २१९ तर कसोटीत सर्वाधिक ३१९ धावा काढल्या आहेत. सचिन तेंडूलकर रणजी करियर मध्ये एकदाच शून्यावर आउट झाला असून त्याची ही विकेट भुवनेश्वरने गेतली होती.


श्रीलंका ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकच कसोटी सामना जिंकू शकली आहे. वन डे सामन्यात सनथ जयसूर्याने शेन वॉर्नपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. अॅडम गिलक्रिस्टने सलग ९६ कसोटी खेळण्याचा विक्रम केला आहे तर डॉन ब्रॅडमनने त्याच्या संपूर्ण करियर मध्ये ६ षटकार मारले आहेत. १०० टेस्ट मध्ये कॅप्टन असलेला ग्रीम स्मिथ एकमेव कप्तान आहे तर कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर छक्का मारायचा पराक्रम क्रिस गेल ने केला आहे.

Leave a Comment