जेम्स बॉंड स्पेशल एडिशन डीबीएस सुपरलेगास हायपरकार


लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माती अॅस्टन मार्टिन ने त्यांची हायपरकार डीबीएस सुपरलेगस ची स्पेशल एडिशन, जेम्स बॉंड सिरीज फिल्म ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिसच्या ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जेम्स बॉंड ००७ या लोकप्रिय गुप्तहेरला मानवंदना देण्यासाठी सादर केली असून या कारची किंमत आहे ३ कोटी ६४ लाख रुपये. जेम्स बॉंडचा हा चित्रपट १९६९ मध्ये रिलीज झाला होता त्यात बॉंडने अॅस्टन मार्टिन डीबीएस कार वापरली होती. नवीन स्पेशल एडिशन जुन्याच डीबीएस वरून प्रेरणा घेऊन तयार केली गेली आहे. यामुळे स्पेशल एडिशनचा १९६९ चा डीबीएस लुक रिक्रीएट झाला आहे. या कारला जुन्या डीबीएस प्रमाणे ओलीव्ह ग्रीन रंग दिला गेला आहे.


कारला क्रोम हॉरीझोंटल ग्रील असून कार्बन फायबर एरोडायनामिक्स दिले गेले आहे. इंटीरीअर मध्ये ब्लॅक लेदर सीटवर रेड स्टीचिंग असून ४ शँपेन फ्लूतस साठी स्पेशल ड्रिंक केस शिवाय दोन बॉटल साठी जागा दिली गेली आहे. स्टीअरिंग कार्बन फायबरचे असून त्यावर लेदर कव्हर आहे. कारला स्टँडर्ड मॉडेलचे ५.२ लिटरचे ट्वीन टर्बो व्ही १२ इंजिन दिले गेले आहे. ही कार ० ते १०० चा वेग अवघ्या ३.४ सेकंदात घेते.

स्पेशल एडिशनची फक्त ५० युनिट बनविली जाणार असून पहिल्या कारची डिलिव्हरी या वर्षअखेर दिली जाणार आहे.

Leave a Comment