झोमॅटोचा हा रोल काका ऑर्डर रद्द झाल्यावर करतो असे काम


ऑनलाईन खाद्यपदार्थ पोहचविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणारी झोमॅटो कंपनी या वर्षी खुप चर्चेत होती. कंपनीला कधीकधी लोकांच्या रागाचा त्रास सहन करावा लागला आणि कधी लोकांनी त्यांचे कौतुक केले. काही महिन्यांपूर्वी झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयची बातमी आली. ज्यामध्ये तो ग्राहकांनी ऑर्डर केले खाद्यपदार्थ खात होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायकल झाला होता. त्यानंतर लोकांनी झोमॅटोला खुप धारेवर घेतले. सोशल मीडियावर सांगितले की तो डिलीव्हरी बॉय पदवीधर होता. ज्यानंतर झोमॅटोबद्दल एक सकारात्मक बातमी आली. ज्यात एका दिव्यांग व्यक्तीला झोमॅटोने रोजगार उपलब्ध करुन दिला होता. ती व्यक्ति आपल्या व्हिलचेअरच्या मदतीने खाद्यपदार्थ डिलीव्हरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर लोकांनी त्या व्हिडीओला खूप पसंती दिली.

झोमॅटोचा एक डिलीव्हरी बॉय गरीब मुलांना जेवण खायला घालत आहे. कोलकाता येथील या डिलीव्हरी बॉयला तेथील मुले रोल काका नावाने हाक म्हणतात.कारण तो एखाद्या ग्राहकाने रद्द केलेल्या अन्नाचे वाटप तो यामुलांमध्ये करतो. कधीकधी तो अंडी, चिकन रोल, बिरयानी इ. सारख्या पदार्थ खायला देतो. जे लोक झोमॅटोवर खाद्यपदार्थांची ऑर्डर देऊन रद्द करतात ते पदार्थ तो या मुलांमध्ये वाटून टाकतो.

त्या डिलीव्हरी बॉयचे नाव पथिक्रित साहा असे असून तो त्या गरीब मुलांसाठी देवापेक्षाह मोठा आहे. तो म्हणाला, चार वर्षांपूर्वी मी माझ्या घराच्या गल्लीतून जात असताना एक मुलगा माझ्या पायापडून माझ्याकडे पैसे मागत होता. तेव्हा मला समजले होते की हि मुले ड्रग्ससाठी पैशांची मागणी करीत आहे. ड्रग्ससाठी तो पैसे मागत होता. मी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते स्वीकारले नाही. मग मी रागाच्या भरात त्याला मारले तेव्हा तो खरे बोलायला लागला. माझी कथा येथे सुरू झाली. त्यानंतर, पथिक्रित साहा यांनी मुलांसाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार केला. त्यांनी मुलांना शिकवले. मुलांसाठी रस आणि पाण्याच्या बाटलीचा स्टॉल देखील लावला बाटली ठेवा. जेणेकरून ते काही कमावू शकतील.

त्यावेळी, पथिक्रित साहा कलकत्ता महानगरपालिकेत काम करत असे. त्यांनी गरीब मुलांसाठी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी झोमॅटोमध्ये काम करण्यास सुरवात केली. कारण आपल्याला घरामध्ये आर्थिक अडचणी येऊ नयेत. तर काही महिने काम केल्यानंतर एक रेस्टॉरंट मालक त्याचा मित्र बनला आणि त्याला मदत करण्यास तयार झाला. जेव्हा ऑर्डर रद्द केली जाते तेव्हा ते अन्न पथिक्रितला देतात आणि पथिक्रित ते अन्न मुलांना देतात.

Leave a Comment