सोशल मिडिया जीनियसना रॉयल फॅमिलीत नोकरीची संधी


दस्तुरखुद्द ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय हिच्यासाठी नोकरी करण्याची संधी हुशार लोकांसाठी आली असून त्यासाठी सोशल मिडिया जीनियस असणे ही मुख्य अट आहे. उमेदवार सोशल मिडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करणे, पोस्ट व्हायरल कश्या करायच्या यात कौशल्य असणे आणि सोशल मिडिया नेटवर्क, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वेबसाईटसाठी कंटेंट लिहिणे, त्यासाठी आवश्यक तो रिसर्च करणे अशी कामे यात करावी लागणार आहेत. तशी जाहिरात रॉयल हाउस होल्ड वेबसाईटवर प्रसिद्ध केली गेली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे २६ मे.


रॉयल कुटुंबातील प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांनी मार्च मध्ये इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली असून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता महाराणी एलिझाबेथ द्वितीय यानाही सोशल मिडियावर दमदार उपस्थिती हवी आहे. त्यासाठी नोकरीची जाहिरात दिली गेली आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला आठवड्यात ३७. ५ तास काम करावे लागेल आणि त्यासाठी वर्षाला ३० हजार पौंड म्हणजे साडे सव्वीस लाख रुपये पगार मिळणार आहे. अनुभव अधिक असेल तर जादा पगार दिला जाणार आहे. शिवाय अन्य फायद्यात पेन्शन स्कीम मध्ये ६ महिन्यानंतर रॉयल पॅलेस तर्फे १५ टक्के वाढ, वर्षाला ३३ सुट्ट्या, दुपारचे जेवण मोफत, आणि बकिंघम पॅलेस मध्ये काम करण्याची संधी मिळेल.

अर्थात यात मुख्यत्वे शाही परिवाराची सगळी अकौंट निवड झालेल्या उमेदवाराला सोशल मिडियावर सांभाळावी लागणार आहेत. राणीला अधिक चांगल्या पद्धतीने पेश करावे लागणार आहे. सी डिजिटल कम्युनिकेशन ऑफिसर (सोशल मिडिया मॅनेजर) या पदावर निवड झालेली व्यक्ती नियुक्त केली जाणार आहे. अर्थात उमेदवार निवडताना त्याने शेअर केलेल्या पोस्टला दहा लाख व्हूज यायला हवेत अशीही अट आहे.

Leave a Comment