गोल्डन टॉयलेटवर बसलेला बोलणारा ट्रम्प रोबो


अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या ३ ते ५ जून दरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जात असून यावेळी त्यांच्या भेटीला विरोध दर्शविण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. या दौऱ्यात ते पंतप्रधान थेरेसा मे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. यावेळी गोल्डन टॉयलेटवर बसलेला, तब्बल १६ फुट उंचीचा, बोलणारा, ट्रम्प यांचा रोबो तयार केला गेला असून विशेष म्हणजे त्यासठी अमेरिकन नागरिक डॉन लीमस याने २५ हजार डॉलर्स म्हणजे १७ लाख रुपये मदत म्हणून दिले आहेत. ट्रम्प त्यांच्या वादग्रस्त मुक्ताफळांसाठी फेमस आहेत. हा बोलणारा रोबो त्याचीच मुक्ताफळे बोलून दाखविणार आहे.

लिमस अमेरिकेतील फिलाडेल्फियाचा रहिवासी आहे आणि तो चीन मधील कारखान्यात काम करतो. या कंपनीत प्राणी संग्रहालयात ठेवता येणारी डायनासोरची मॉडेल्स तयार केली जातात. लिमस सांगतो, मी ट्रम्प यांचा समर्थक नाही. चेष्टा म्हणून हा रोबो बनविला आहे. आम्ही ६० फुटांचे डायनासोर बनवू शकतो मग १६ फुटी ट्रम्प बनविण्यात काय अडचण येणार? हा रोबो मुद्दाम टॉयलेट सीटवर बसविला आहे कारण ट्रम्प याच्या बहुतेक वेळ येथेच जातो आणि येथे बसूनच त्यांना त्यांचे सर्वश्रेष्ठ विचार सुचतात.


रोबो बनविला तेव्हा लिमसच्या साथीदारांना तुरुंगवास होईल अशी भीती वाटली पण लिमस सांगतो मी त्यांना समजावले, अमेरिकेत आम्ही करू शकतो त्यापैकी ही एक आहे. गतवेळी ट्रम्प यांच्या ब्रिटन भेटीवेळी बेबी ट्रम्प बलून आकाशात सोडला गेला होता. यावेळीही हा बलून असेल असे समजते.

Leave a Comment