वर्ल्ड कप साठी रवी शास्त्रीचे साईबाबाना साकडे


टीम इंडिया ३० मे ते १४ जुलै या कालावधीत इंग्लंड येथे होत असलेल्या वर्ल्ड कप सामन्यासाठी मंगळवारी इंग्लंडला रवाना झाली असून त्यापूर्वी टीमचे कोच रवी शास्त्री, फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांनी शिर्डीला जाऊन साईबाबाच्या दरबारात हजेरी लावली. या संदर्भातले फोटो श्रीधर यांनी ट्विटर अकौंटवर शेअर केले असून ते लिहितात, साईबाबांच्या आशीर्वादासाठी शिर्डीला आलो आहोत. गौतम सिंघानिया यांनी त्याचे खासगी विमान प्रवासासाठी दिले, त्यांना धन्यवाद. मंदिरात जाऊन दर्शन घेत असतानाचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.


टीम इंडिया लंडनला रवाना झाली असली तर कोच रवी शास्त्री आणि कप्तान विराट कोहली बुधवारी रवाना होत आहेत. शिर्डीहून परतल्यावर रवी शास्त्री आणि विराट यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, टीम इंडिया पूर्ण क्षमतेने खेळली तर तिसरा विश्व कप विजय दूर नाही. विकेटकीपर धोनीचे कौतुक करताना शास्त्री म्हणाले, या स्पर्धेत धोनीची भूमिका अहम आहे. माही नुसता उत्तम विकेटकीपर नाही तर संपूर्ण सामना फिरविण्याची त्याची ताकद आहे. त्याला काही सांगावे लागत नाही. त्याचा आणि विराटचा ताळमेळ उत्तम आहे. माही खेळाडू म्हणून आमच्यासाठी खास आहे.

वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी ऑलराउंडर केदार जाधव फिटनेस टेस्ट पास झाला ही चांगली बातमी आहे. आयपीएल मध्ये पंजाब किंग्स इलेव्हन तर्फे खेळताना तो जखमी झाला होता. विराटच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंची टीम वर्ल्ड कप साठी निवडली गेली असून टीमचा पहिला सामना ५ जून रोजी साउथ आफ्रिकेविरुद्ध होनर आहे. त्यापूर्वी इंग्लंड मध्ये न्यूझीलंड बरोबर २५ मे रोजी तर बांगलादेश विरुध्द २८ मे रोजी टीम इंडिया सराव सामने खेळणार आहे.

Leave a Comment