२ रुपयांनी महाग झाले अमूलचे दूध


नवी दिल्ली – दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या अमूलने दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली असून ही दरवाढ राजधानी, महाराष्ट्रासह इतर राज्यात आजपासून लागू झाली आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ) ही अमूल या ब्रँडच्या नावाने दुधाची विक्री करते. दोन वर्षापूर्वी मार्च २०१७ मध्ये या सहकारी संस्थेने दुधाचे दर वाढविले होते.

ही दरवाढ २१ मेनंतर लागू होणार असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तरांचल, महाराष्ट्र आणि इतर राज्यात ही दरवाढ होणार असल्याचे जीसीएमएमएफने म्हटले आहे. अर्धा लिटरचे अमूल गोल्ड हे २७ रुपयांना, अमूल शक्ती हे २५ रुपयांना, अमूल डायमंड हे २८ रुपयांना तर अमूल ताजा हे २१ रुपयांना अहमदाबादमधील बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर जीसीएमएमएफने गायीच्या दुधाच्या किमतीत कोणताही बदल नसल्याचे म्हटले आहे. हा निर्णय दूध उत्पादकांना चांगला खरेदी दर देण्यासाठी घेण्यात आल्याचे सहकारी संस्थेने म्हटले आहे. काही महिन्यापूर्वी दूध उत्पादक संघटनांनी उत्पादन खर्च वाढल्याने दर वाढविल्याचेही संस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment