ऑस्ट्रेलियात मतदान न केल्यास भरावा लागतो दंड


भारताबरोबरचा ऑस्ट्रेलियात १८ मे रोजी सार्वजनिक निवडणुकांचे मतदान पार पडले. विशेष म्हणजे १९२४ सालापासून ऑस्ट्रेलियात मतदान करणे नागरिकांना बंधनकारक केले गेले आहे आणि मतदान न करणाऱ्यांना १ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. अर्थात मतदान बंधनकारक असल्याने १९२४ पासून येथे सार्वत्रिक निवडणुकात ९१ टक्यापेक्षा अधिक मतदान होते आहे. १९९४ मध्ये ही टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९६.२२ होती.

भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियात १८ वर्षे पूर्ण असलेली व्यक्ती मतदान करू शकते. मतदान केले नाही तर सरकार मतदान न करण्याचे कारण मागते. हे कारण समाधानकारक नसेल तर दंड ठोठावला जातो. सरकारच्या मते मतदान केल्याने जनतेचा राजकारण, सरकार मधील इंटरेस्ट वाढतो. मतदान बंधनकारक झाल्याने अनेक संस्था त्याविरोधात आवाज उठवीत असून हे लोकशाहीतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन करत आहेत तर मतदानाचे समर्थक सरकार निवडताना जनतेची भागीदारी असली पाहिजे असे सांगत आहेत.

ऑस्ट्रेलियात दर तीन वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक होते सरकार मतदाराच्या सर्व सुविधांची पुरेपूर काळजी घेते. स्वतःचे घर नसेल तर मतदार मतदानासाठी प्रवासी मतदार म्हणून नोंदणी करू शकतो. मतदार रुग्णालयात दाखल असेल तर पोस्टाने मत देऊ शकतो.

Leave a Comment