
कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवर चर्चा करुन ईव्हीएम मशीनमध्ये बदल करणे किंवा ते बदलण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. एकत्र येऊनच हे युध्द जिंकता येणार आहे. सर्व विरोधकांना यासाठी एकत्र येण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
एक्झिट पोलच्या चर्चांवर विश्वास नाही – ममता बॅनर्जी
काल लोकसभा निवडणुकीतील सातवा व शेवटचा टप्पा पूर्ण झाला. विविध एक्झिट पोलचे अंदाज या टप्प्यानंतर समोर येत असून या एक्झिट पोलच्या चर्चांवर आपला विश्वास नसल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
