या पठ्ठ्याने शरीरावर गोंदवले चक्क १५० टॅटू आणि शरीरात केले ४० प्रकारचे बदल


आपण आपल्या वेगळेपणासाठी ओळखले जावे यासाठी जगभरातील अनेक लोक काहीना काही करतच असतात. काहीजण त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी तर काहीजण त्यांनी केलेल्या विचित्र गोष्टींमुळे ओळखले जातात. पण या जगात एक अशी व्यक्ती आहे ज्याने आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतले आहे. त्याने आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. त्याचबरोबर त्याने शरीराचे बॉडी मॉडिफिकेशन देखील करून घेतले आहे.

या व्यक्तीचे नाव इथन ब्रॅंबल असे असून सर्वात जास्त टॅटू काढण्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड यूकेतील क्रिस डलजेल यांच्याकडे होता. शरीरावर त्याने ६०० टॅटू काढले होते आणि त्याने यासाठी ३८ हजार पाऊंड खर्च केले होते. त्याचे चेहऱ्यावर आणि डोळ्यातही टॅटू काढले.

इथन ब्रॅंबलने क्रिसचा रेकॉर्ड मोडला आहे. आता वर्ल्ड मोस्ट मोडिफाइड यूथ असे इथनला म्हटले जात आहे. आपल्या शरीरावर २२ वर्षीय इथन ब्रॅंबलने केवळ १५० टॅटू काढले आहेत आणि ४० पेक्षा जास्त बॉडी मोडिफिकेशन केले आहेत. त्याने त्याची जिभ सुद्धा दोन भागात विभागली आहे. तर कानांची छिद्रे मोठी केली आहेत. त्याचबरोबर त्याने हातांमध्ये सिलिकॉन स्पायडरही टाकून घेतले आहेत.

याबाबत इथन सांगतो की, जिभेचे मॉडिफिकेशन या सगळ्यात सर्वात कठीण काम होते. त्याला असे केल्यानंतर सीरिंजच्या माध्यमातून पाणी प्यावे लागले. कारण त्याला त्यावेळी दोन भागात विभागलेल्या जिभेला बॅलन्स करणे येत नव्हते. इथन पुढे सांगतो की, नवनवीन लूक्स करणे मला नेहमीच आवडते. मी जसजसा मोठा होत गेलो, माझ्या नाकात मी पियर्सिंग केले. हे सगळे मला फार चांगले वाटत गेल्यानंतर विचार केला की, असेच काही बॉडी मॉडिफिकेशन मी केले पाहिजे.

Leave a Comment