मलायकासोबतच्या विवाहाबद्दल काय म्हणतो अर्जुन कपूर?


बी टाऊनसह प्रेक्षकांमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमलीलाच्या अनेक वावड्या ऐकायला मिळतात. विवाहबंधनात दोघे कधी अडकणार याची चर्चा होत असते. पण याबाबत दोघांनीही आपले मत मोकळेपणाने मांडले नव्हते. यावर अखेर आपले मौन सोडले अर्जुनने आहे.

माझ्या लग्नाची चर्चा लोक करतात हे स्वाभाविक आहे. कारण माझ्या अनेक मित्रांची लग्ने झाली आहेत. त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. लोकांनी अशावेळी माझ्या लग्नाबद्दल विचारणा करणे साहजिक असल्याचे अर्जुन म्हणाला. अर्जुन आणि मलायकाने सुरुवातीच्या काळात आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते आता उघडपणे एकत्र फिरतात, पार्ट्यांना हजर राहतात.

त्याचबरोबर अर्जुन म्हणतो, माझ्या खासगी व्यावसायिक आयुष्यात मी खूश आहे आणि मला असेच राहायचे आहे. मी मागच्या काही महिन्यांपासून सर्वकाही लपवून ठेवल्यामुळे यापुढे काही सांगायचे असेल तर मी नक्की बोलेन. अर्जुन कपूर सध्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटात काम करीत आहे. २४ मे रोजी राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment