हॉकीस्टिक सारख्या बॅटने खेळले जात होते क्रिकेट


क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार ३० मे पासून सुरु होत असून १४ जुलै पर्यंत तो रंगणार आहे. क्रिकेट या जागतिक स्तरावर लोकप्रिय झालेल्या खेळाची नक्की सुरवात कधी आणि कशी झाली याचे अनेक किस्से सांगितले जातात आणि त्याच उत्सुकतेने ऐकले जातात. मात्र क्रिकेटची सुरवात नक्की कधी झाली याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत.


१५९८ मध्ये इटालियन भाषा तज्ञ जॉन फ्लेरियोच्या शब्दकोशात म्हणजे अ वर्ल्ड ऑफ वर्डस मध्ये प्रथम क्रिकेट ए विकेट हा शब्द आढळतो. १५ व्या शतकाच्या अखेरी क्रिकेटचा विकास सुरु झाला आणि आजही तो सुरूच आहे. कारण त्यावेळे पासून बॉल, बॅट, पीच, खेळाडूंचे पोशाख, नियम, सामने यात बदल होत आहेत.


१६२० मध्ये बॅटचा वापर प्रथम केला गेला. त्यावेळी मेंढपाळ आपसात क्रिकेट खेळत असत. म्हणजे हातात असलेल्या काठ्यांनी बॉल मारत असत. हे बॉल कापड आणि लोकरीपासून बनविले जात. म्हणजे थोडक्यात चिंध्यांचे बॉल. १७५० मध्ये बॅटचा आकार हॉकी स्टिक सारखा होता. ती चपटी आणि धारदार आणि लांब हँडल ची होती. १७७४ मध्ये सध्याच्या बॅटशी साम्य असलेली बॅट वापरात आली मात्र तिचा खालचा भाग गोलाकार होता आणि लांबी जास्त होती. १९ व्या शतकात बॅटचा खालचा भाग फ्लॅट बनविला गेला आणि ती अखंड एकाच लाकडातून बनविली गेली. तिची लांबी कमी झाली आणि वजन अडीच ते तीन किलो झाले. १९०० मध्ये जेव्हा ओवरआर्म बोलिंग सुरु झाली तेव्हा बॅट जास्त मजबूत बनविली गेली आणि थोडी रुंद झाली.क्रिकेट नियामक संस्था एमसीसीच्या नियमानुसार बॅटची लांबी ९६.५ सेंटीमीटर आणि रुंदी १०.८ सेंटीमीटर ठरविली गेली.


१७४४ मध्ये प्रथम लेदर बॉल वापरला गेला त्यात मात्र आजही फारसा बदल नाही. हे बॉल कॉर्क, लेदर व रबर वापरून आजही बनविले जातात. १९७७ पर्यंत लाल रंगाचे बॉल वापरले जात होते मात्र आता फक्त कसोटी मध्ये लाल रंगाचा बॉल वापरला जातो. १९७७ मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियात कॅरी पॅकर सिरीज मध्ये पांढरा बॉल वापरला गेला. तेव्हापासून वन डे सामन्यात पांढराच बॉल वापरला जात आहे मात्र खेळाडूंचे कपडे रंगीत झाले.


२०१५ मध्ये डे नाईट क्रिकेट सामने सुरु झाले तेव्हा गुलाबी रंगाचे बॉल वापरात आले. क्रिकेटचे लिखित नियम १७४४ मध्ये बनले. त्यात पीचची लांबी पूर्वीच्या तुलनेत १ यार्डने कमी झाली. १७४४ पूर्वी पीच २३ यार्ड म्हणजे २१.०३ मीटर असायचे ते आता २२ यार्ड म्हणजे २०.११ मीटर असते.

Leave a Comment