कधीकाळी लोकांवर उपचार करणारी; सोशल मीडियावर झाली प्रसिद्ध


आजच्या घडीला सोशल मिडिया एक असे व्यासपीठ बनले आहे कि ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला काही ओळख नसताना फोटो किंवा काही अपलोड केल्यानंतर ती व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येते. आता हेच बघा ना न्यूजर्सीमध्ये राहणारी ३३ वर्षांची मॉडेल आणि अभिनेत्री जसेनिया वाइससोबत असेच काही झाले आहे. सोशल मीडियावर लोकांनी तिची खुप प्रशंसा केली आणि तिने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आज तिचे लाखो चाहते आहेत.

जसेनियाने आपल्या या प्रवासाबाबत सांगितले की, ती मॉडलिंगपुर्वी एका मानसोपचार दवाखान्यात काम करत होती. तेथे मनोरुग्ण आणि आत्महत्या करणाऱ्या रुग्णांची ती देखरेख आणि उपचार करत होती. तिने सांगितले की, तिने हे जवळपास ६ वर्ष काम केले. जसेनियाने सांगितले की, तिने कधीच विचार केला नव्हता की, ती मॉडेलिंगमध्ये करियर करेल. ती पुढे सांगते की, ती जशजशी मोठी होत गेली तिला लोकांचे प्रोत्साहन मिळणे सुरु झाले.

विशेषतः सोशल मीडियावर तिला तिच्या फोटोजवर चांगल्या प्रतिक्रिया आणि लोकांची प्रशंसा मिळत होती. परंतु त्यावेळी तिला शाळेवर फोकस करायचे असल्यामुळे तिने आपले अकाउंट डिलीट केले. ती २०१०मध्ये पुन्हा सोशल मीडियावर आली तर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून तिने मॉडेल म्हणून करियर करण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी सप्टेंबरमध्ये O.Y.E नावाच्या मॅगझीनने तिचा कव्हर फोटो छापला. त्याचबरोबर इंटरनेटवर तिचे लाखो चाहते आहेत, फक्त इंस्टाग्रामवर जसेनियाला २ लाख लोक फॉलो करतात.

Leave a Comment