पुढील वर्षाच्या गांधी जयंतीला रिलीज होणार टायगर श्रॉफचा ‘रॅम्बो’


‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून नुकताच अभिनेता टायगर श्रॉफ हा तुमच्या भेटीला आला होता. त्यानंतर तो ३ चित्रपटात झळकणार आहे. तो जुलैमध्ये ‘बागी ३’ च्या शूटींगला सुरुवात करेल आणि त्यानंतर पुढील वर्षी जानेवारीत तो सिल्वेस्टर स्टॅलोनच्या ‘रॅम्बो’ चित्रपटाच्या रिमेकच्या कामाला सुरूवात करणार आहे.

सिध्दार्थ आनंद ‘रॅम्बो’ रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत. ते सध्या ह्रतिक आणि टायगर यांना घेऊन चित्रपट बनवित आहेत. सिध्दार्थ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल आघाडीच्या वर्तमानपत्राशी बोलताना म्हणाले, रॅम्बोची पूर्वतयारी आम्ही सप्टेंबरपासून करणार आहोत. टायगरची तयारी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरु होईल आणि शूटींगला सुरुवात आम्ही जानेवारीत करु. लवकरच रेकीचे काम सुरू होईल त्याचबरोबर हा चित्रपट पुढील वर्षी गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबरला रिलीज करण्यात येईल.

सिध्दार्थ या चित्रपटाचे स्वरुप सांगताना म्हणाले, प्रथमतः अॅक्शनसाठी ‘रॅम्बो’ हा चित्रपट ओळखला जातो, परंतु प्रेक्षकांना भावणारी कथा माझ्या चित्रपटामध्ये असेल, याची मी खात्री देतो. ही कथा सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीशी जोडलेली असेल. अर्थात अॅक्शन तर असेलच पण स्टिव्हन स्पिलबर्गच्या म्हणण्यानुसार इमोशन शिवाय अॅक्शन पाहताना प्रेक्षक कंटाळतात. त्यामुळे इमोशनची जोड अॅक्शनला असेल.

Leave a Comment