ऐवढी आहे प्रियंकाच्या घड्याळाच्या किंमती


बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राला ‘ग्लोबल स्टार’ अशी ओळख मिळाल्यानंतर ती फॅशन आयकॉन म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे. तिने तिच्या अभिनयाची भारतासह आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही छाप पाडली आहे. ती नेहमी तिच्या फॅशन सेन्स किंवा महागडी स्टाईल कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असते. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील तिच्या लूकमुळे सध्या ती प्रसिद्धीझोतात आली आहे. तर तिने रेड कार्पेटवर सर्वांवर भूरळ पाडलीच आहे. पण तिने सर्वांना तिच्या महागड्या स्टाईलनेही आश्चर्यचकित केले आहे.

नुकतेच प्रियंकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. तिने कान्समध्ये सहभागी होण्यापूर्वी तिच्या घड्याळाचा फोटो शेअर करून ‘कान्स’ची तयारी करत असल्याचे तिने सांगितले होते. तिचे निक जोनाससोबतचेही बरेचसे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या या घड्याळाने या फोटोंमध्येही लक्ष वेधले आहे. या घड्याळाची किंमतही तेवढीच चक्रावणारी ठरली आहे.

या फोटोंमध्ये प्रियंकाने ‘चॉपर्ड’ या ब्रॅन्डचे घड्याळ हातात घातल्याचे पाहायला मिळते. तब्बल २६ लाख ५४ हजार एवढ्या किमतीची हिरेजडीत असेलली ही घड्याळ आहे. बऱ्याच महागड्या कार तिच्या या घड्याळाच्या किमतीत खरेदी करता येतील. प्रियंकांच्या महागड्या स्टाईलचा अंदाज या घड्याळावरून चाहत्यांना लावता येईल.

Leave a Comment