ताइवान सरकारकडून समलैंगिक विवाहाला मिळाली मंजुरी


ताइवान सरकारकडून समलैंगिक विवाहाला मंजुरी देण्यात आल्यामुळे ताइवान हा समलैंगिकतेच्या बाबत पहिला आशियाई देश बनला असल्याचे म्हटले जात आहे. संसद भवनाने काल या समलैंगिक विवाहाला मंजूरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भातील वृत्त अलजजीरा या वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ताइवान येथील समलैंगिक जोडप्यांसाठी निवारक स्थायी संघ आणि सरकारी कार्यलयात समलैंगिक विवाहाचे रजिस्ट्रेशन करण्याच्या अर्जाला मंजुरी देणारा कायदा पास केला आहे. यापूर्वी 24 मे पर्यंतचा कालावधी समलैंगिक विवाहाचा कायदा पास होण्यासाठी दिला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजधानी ताइपे येथील संसद भवनाबाहेर भर पावसात या कायद्यासाठी मतदान व्हावे यासाठी मागणी केली होती. या कायद्यासाठी 66 मत पडली होती. तर 25 मत ही विरोधकांनी दर्शवली होती. तर हा कायदा लागू झाल्याने ताइवान येथील अनेक समलैंगिकांनी जल्लोषात त्यांचा आनंद साजरा केला आहे.

Leave a Comment