हिंदू देवतांचा अमेझॉनकडून पुन्हा अपमान


नवी दिल्ली : सध्या ट्विटरवर #BoycottAmazon ट्रेंड करत आहे. कारण अशा काही वस्तू ई कॉमर्स कंपनी अमेझॉनकडून विकल्या जात आहेत, ज्यामध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला आहे. हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे अमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. अमेझॉनवर बहिष्कार टाकण्यासोबतच ग्राहकांकडून संतापही व्यक्त केला जात आहे.

काही युझर्सने ट्विटर केलेल्या पोस्टनुसार, हिंदू देवतांचे अमेझॉनने फोटो पायपुसनीवरही टाकले आहेत. शिवाय हिंदू देवतांचे फोटो असलेले टॉयलेट कव्हर विकले जात आहेत. गणपती, हनुमान आणि महादेवाचे फोटो यामध्ये आहेत. अमेझॉनचा युझर्सकडून समाचार घेण्यात आल्यामुळेच #BoycottAmazonही मोहिम चालवली जात आहे. सोशल मीडियावर ही मोहिम चालवण्यासोबतच अमेझॉन अप अनइंस्टॉल केल्याचे स्क्रीनशॉटही टाकले जात आहेत. शिवाय सर्वांनीच हे अॅप डिलीट करावे, असे आवाहन केले जात आहे.

अमेझॉनकडून ही चूक होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिरंगा असणारी पायपुसनी आणि महात्मा गांधींजींचा फोटो असणारी चप्पल अमेझॉनने आणली होती. त्यानंतर अमेझॉन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागल्यानंतर अमेझॉनने या वस्तू आपल्या संकेतस्थळावरुन हटवल्या होत्या.

Leave a Comment