क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये विजेत्याला मिळणार ४० लाख डॉलर्स


आयसीसी वर्ल्ड कप सामने यंदा इंग्लंड मध्ये ३० मे पासून सुरु होत असून यंदाच्या वर्षी विश्वविजेत्या टीम ला तब्बल ४० लाख डॉलर्स बक्षीस म्हणून मिळणार आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सर्व वर्ल्ड कप मध्ये ही रक्कम सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. अंतिम फेरीत उपविजेल्या टीमला २० लाख डॉलर्स दिले जाणार आहेत.

अन्य बक्षीस रकमेत उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चारी टीमना प्रत्येकी ८ लाख डॉलर्स दिले जाणार आहेत. लीग पातळीवरील प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या टीमला ४० हजार डॉलर्स तर लीग पार करून पुढे जाणाऱ्या टीमला १ लाख डॉलर्स दिले जाणार आहेत. हे सामने इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मे पासून सुरु होत असून ४६ दिवस चालणार आहेत. या स्पर्धेत १० टीम सहभागी होत आहेत.

अंतिम सामना १४ जुलै रोजी क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्डस स्टेडियमवर होत आहे. उपांत्य सामना ११ जुलै रोजी ओत असून पहिला सामना इंग्लंड आणि द.आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही टीम आजपर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकू शकलेल्या नाहीत.

Leave a Comment